Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आम्रपाली बुद्ध विहार जागृती नगर, कुर्ला येथे भारतीय बौद्ध महासभेची शाखा स्थापन

mosami kewat by mosami kewat
October 18, 2025
in बातमी
0
आम्रपाली बुद्ध विहार जागृती नगर, कुर्ला येथे भारतीय बौद्ध महासभेची शाखा स्थापन
       

कुर्ला : जागृती नगर, कुर्ला (पूर्व) येथील ऐतिहासिक आम्रपाली बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभेची नवीन शाखा स्थापन करण्यात आली आहे.

सुमारे ६० ते ७० वर्षांपूर्वी सूर्यपुत्र यशवंत (भैय्यासाहेब) आंबेडकर यांच्या हस्ते या बुद्ध विहाराची स्थापना झाली होती. स्थापनेपासूनच येथे विविध सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम सातत्याने राबवले जात आहेत. कुर्ला परिसरातील सर्वात मोठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक हेदेखील या परिसरातूनच निघते, हे या विहाराचे विशेष वैशिष्ट्य आहे.

या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेची शाखा स्थापन झाल्यामुळे परिसरात धार्मिक व सामाजिक जागृतीचे नवे वातावरण निर्माण झाले आहे. विहारात नियमित धम्मकार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून समाजातील तरुणांना समता सैनिक दलात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले जाईल. त्यामुळे या परिसरात एक नवी धम्म क्रांती घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या शाखेचे अध्यक्ष म्हणून सागर संजय बुद्धवंत यांची नियुक्ती करण्यात आली असून तब्बल ४० सदस्यांची जंबो कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे.

या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे झोन अध्यक्ष अनंत जाधव गुरुजी, वंचित बहुजन आघाडीचे स्वप्नील जवळगेकर, रतन तायडे गुरुजी, राजेंद्र वाडते गुरुजी तसेच अनेक धम्मबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने करण्यात आली. मार्गदर्शनपर भाषण, प्रेरणादायी विचार आणि उत्साही वातावरणात हा ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न झाला.


       
Tags: buddhismBuddhistkurlaMaharashtramumbaiVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

अमेरिका भारताचे परराष्ट्र धोरण ठरवत आहे का? ; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला सवाल!

Next Post

मोठी बातमी! MCX, IBJA वर सोने-चांदी महागले; जाणून घ्या आजचे दर

Next Post
मोठी बातमी! MCX, IBJA वर सोने-चांदी महागले; जाणून घ्या आजचे दर

मोठी बातमी! MCX, IBJA वर सोने-चांदी महागले; जाणून घ्या आजचे दर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा
बातमी

महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा

by mosami kewat
April 4, 2026
0

Election Commission : निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेवरून राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते...

Read moreDetails
Rahuri Election 2026 ; वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर!

Rahuri Election 2026 ; वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर!

April 4, 2026
पोलीस ठाण्यांमधील धार्मिक उदासीकरण आणि भोंदूगिरी थांबवा; वंचित बहुजन महिला आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन

पोलीस ठाण्यांमधील धार्मिक उदासीकरण आणि भोंदूगिरी थांबवा; वंचित बहुजन महिला आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन

April 4, 2026
गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नागपुरात 'नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर' आंदोलन

गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नागपुरात ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन

April 4, 2026
श्रीगोंदा आगारातील ‘बोगस बिल’ प्रकरणाची चौकशी; वंचितच्या ‘अर्धनग्न’ आंदोलनानंतर प्रशासन नमले

श्रीगोंदा आगारातील ‘बोगस बिल’ प्रकरणाची चौकशी; वंचितच्या ‘अर्धनग्न’ आंदोलनानंतर प्रशासन नमले

April 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home