नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची भोकर येथे भव्य प्रचार सभा पार पडली. यावेळी सभेला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू असताना, सुजात आंबेडकर यांच्या सभांना वेगवेगळ्या जिल्ह्यांतून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याच मालिकेतील भोकर येथील सभेत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. ते म्हणाले, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि ही निवडणूक वंचित बहुजन आघाडीच जिंकणार आहे. आपले स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणा. असे त्यांनी नागरिकांना आवाहन केले.
या सभेला वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये राज्य सदस्य अविनाश भोसीकर, नांदेड जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, प्रशांत इंगोले, श्याम कांबळे, आकाश जोंधळे, राहुल सोनसळे यांचा समावेश होता.






