Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मनपाच्या निष्काळजीपणामुळे सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुरावानंतर मनपाकडून १ कोटी १५ लाखांची मदत जाहीर

mosami kewat by mosami kewat
February 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मनपाच्या निष्काळजीपणामुळे सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुरावानंतर मनपाकडून १ कोटी १५ लाखांची मदत जाहीर
       
औरंगाबाद: मुकुंदवाडी गाव परिसरात बॅनर काढण्याचे काम सुरू असताना विद्युत तारेचा धक्का लागून अमोल दिनकर जाधव (२९, रा. संजय नगर) या मनपा सफाई कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत रवी रीडलोन हे कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मनपा प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंदवाडी परिसरात अनधिकृत बॅनर काढण्याचे काम मनपा प्रशासनाकडून सुरू होते. यावेळी विद्युत वाहक तारांचा अंदाज न आल्याने अमोल जाधव यांना जोराचा करंट लागला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या कामावेळी सुरक्षेची कोणतीही साधनं पुरवण्यात आली नसल्याचा आरोप केला जात आहे. (Vanchit bahujan aghadi)

ही घटना मनपा प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी आणि पोलीस ठाण्यात धाव घेत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर संबंधित दोषी अधिकारी, कर्मचारी आणि अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मनपा आयुक्त यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मयत अमोल दिनकर जाधव यांच्या कुटुंबियांना विमा योजनेअंतर्गत १ कोटी १५ लाख रुपये आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच शासनाच्या वतीने बॅनर लावणाऱ्या संबंधितांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Vanchit bahujan aghadi)

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मनपा प्रशासनाने आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला तात्काळ न्याय व सर्व शासकीय मदत मिळावी यासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने पाठपुरावा करणार आहे.

Tags: aurangabadMaharashtraMukundwadiPoliticalVanchit Bahujan Aaghadivbaforindiaमनपा
Previous Post

एपस्टीन फाईल’ प्रकरण – ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी; मुंबईत होणार निदर्शने!

Next Post

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; माजी महापौर अभिषेक कळमकरवर गुन्हा दाखल

Next Post
नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; माजी महापौर अभिषेक कळमकरवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; माजी महापौर अभिषेक कळमकरवर गुन्हा दाखल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद
बातमी

Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद

by mosami kewat
March 14, 2026
0

औरंगाबाद : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवरील दुरुस्ती अर्जावर...

Read moreDetails
मध्य-पूर्व संघर्षाचा भारतीय जहाजांवर परिणाम; अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची व्यवस्था करावी – ॲड. प्रकाश आंबेडकर

मध्य-पूर्व संघर्षाचा भारतीय जहाजांवर परिणाम; अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची व्यवस्था करावी – ॲड. प्रकाश आंबेडकर

March 14, 2026
औरंगाबाद : प्राध्यापक भरती अर्जासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश

औरंगाबाद : प्राध्यापक भरती अर्जासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश

March 14, 2026
अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने

अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने

March 14, 2026
सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा; सरकारने नजरकैद केली रद्द, NSA अंतर्गत केलेली कारवाई मागे

सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा; सरकारने नजरकैद केली रद्द, NSA अंतर्गत केलेली कारवाई मागे

March 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home