Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

गोवंडीतील लुंबिनीबाग SRA वादात रहिवासी अनिल पगारे यांचा मृत्यू; वंचित बहुजन आघाडीचे कुटुंबीयांना सांत्वनपर भेट 

mosami kewat by mosami kewat
March 8, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
गोवंडीतील लुंबिनीबाग SRA वादात रहिवासी अनिल पगारे यांचा मृत्यू; वंचित बहुजन आघाडीचे कुटुंबीयांना सांत्वनपर भेट 
       
मुंबई : गोवंडी येथील लुंबिनीबाग एस.आर.ए. (SRA) सोसायटीत आपल्या हक्काच्या घरासाठी लढा देणाऱ्या अनिल पगारे या रहिवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एस.आर.ए. प्रशासन आणि देवनार पोलीस ठाण्याच्या जाचाला कंटाळून अनिल पगारे यांना आपला जीव गमवावा लागल्याचा खळबळजनक आरोप कुटुंबियांनी केला आहे. या घटनेचे पडसाद उमटताच वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. (Mumbai News)

नेमकी घटना काय?

लुंबिनीबाग एस.आर.ए. सोसायटीतील रहिवासी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या हक्काच्या घरासाठी कायदेशीर लढा देत आहेत. या प्रक्रियेत प्रशासनाकडून होणारी सक्ती आणि देवनार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून मिळणारी वागणूक यामुळे अनिल पगारे मानसिक दडपणाखाली होते. याच संघर्षात त्यांचा बळी गेल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

प्रकाश आंबेडकरांचे तातडीचे आदेश :

या घटनेची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय ॲड. प्रकाश आंबेडकर यांना मिळताच, त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तातडीने मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे यांना पगारे कुटुंबाची भेट घेण्याचे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले.

आदेश मिळताच मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे यांनी लुंबिनीबाग येथे जाऊन पगारे कुटुंबाची सांत्वन भेट घेतली. यावेळी त्यांनी एस.आर.ए. प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा केली. या चर्चेनंतर प्रशासनाकडून सुरू असलेली कारवाई सध्या थांबवण्यात आली आहे. (Mumbai News)

हक्काच्या घरासाठी लढणाऱ्या एका सामान्य माणसाचा असा बळी जाणे ही लोकशाहीची हत्या आहे. पगारे कुटुंब आज उघड्यावर पडले असून, याला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे असे चेतन अहिरे म्हणाले. वंचित बहुजन आघाडी या प्रकरणात पगारे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, न्यायासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Tags: MaharashtraPoliticalpoliticssravbaforindia
Previous Post

आज रंगणार टी-२० विश्वचषकाचा महामुकाबला ; भारत-न्यूझीलंड अंतिम फेरीत आमनेसामने

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्त्रिया

Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्त्रिया

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्त्रिया

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी; नियोजनाच्या अभावावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संताप
बातमी

गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी; नियोजनाच्या अभावावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संताप

by mosami kewat
March 29, 2026
0

अकोला : गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे आज एक दुर्दैवी घटना घडली असून वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव सिरसाठ यांचा...

Read moreDetails
पुण्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद ; ओबीसी प्रश्नांवर ठाम भूमिका,ओबीसी नेत्यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला लवकरच भेटणार

पुण्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद ; ओबीसी प्रश्नांवर ठाम भूमिका,ओबीसी नेत्यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला लवकरच भेटणार

March 28, 2026
IPL २०२६ चा बिगुल वाजला! आज चिन्नास्वामीवर रंगणार आरसीबी विरुद्ध हैदराबादचा महासंग्राम

IPL २०२६ चा बिगुल वाजला! आज चिन्नास्वामीवर रंगणार आरसीबी विरुद्ध हैदराबादचा महासंग्राम

March 28, 2026
अशोक खरात प्रकरण हिमनगाचे टोक : अशोक खरात या प्रकरणातील मोठा साक्षीदार; कोठडीत त्याच्या जीविताला धोका!

अशोक खरात प्रकरण हिमनगाचे टोक : अशोक खरात या प्रकरणातील मोठा साक्षीदार; कोठडीत त्याच्या जीविताला धोका!

March 28, 2026
अंबडमध्ये भटके-विमुक्तांचा जनआक्रोश मोर्चा; जनगणनेत स्वतंत्र कॉलमची मागणी

अंबडमध्ये भटके-विमुक्तांचा जनआक्रोश मोर्चा; जनगणनेत स्वतंत्र कॉलमची मागणी

March 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home