Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home क्रीडा

कॉमनवेल्थ 2026 : मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; भारताला मिळवून दिलं पहिलं सुवर्णपदक

mosami kewat by mosami kewat
July 27, 2026
in क्रीडा, बातमी, सामाजिक
0
कॉमनवेल्थ 2026 : मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; भारताला मिळवून दिलं पहिलं सुवर्णपदक
       
Mirabai Chanu, Commonwealth Games 2026 : भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. महिलांच्या 48 किलो वजनी गटात तिने एकूण 190 किलो (स्नॅच 85 किलो + क्लीन अँड जर्क 105 किलो) वजन उचलत सुवर्णपदकावर नाव कोरले. या विजयासह मीराबाईने कॉमनवेल्थ स्पर्धेच्या इतिहासात सलग तिसरे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.

याआधी तिने 2018 च्या गोल्ड कोस्ट आणि 2022 च्या बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्येही भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. आता ग्लासगोमध्येही विजेतेपद कायम राखत तिने आपल्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीची छाप पाडली आहे.

स्पर्धेच्या स्नॅच प्रकारात सुरुवातीचा प्रयत्न अपयशी ठरला असला तरी मीराबाईने जबरदस्त पुनरागमन केले. दुसऱ्या प्रयत्नात 82 किलो वजन उचलल्यानंतर तिने तिसऱ्या प्रयत्नात 85 किलो वजन उचलून नवा स्पर्धा विक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये 105 किलो वजन सहज उचलत तिने सुवर्णपदक निश्चित केले.

एकूण 190 किलो वजन उचलून मीराबाईने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत भारताच्या पदक खात्याची सुवर्ण सुरुवात केली. तिच्या या ऐतिहासिक यशामुळे भारतीय वेटलिफ्टिंगला पुन्हा एकदा जागतिक स्तरावर नवी उंची मिळाली असून, देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: championship 2026Commonwealth Games 2026Gold medalIndanmirabai chanusportsWinner
Previous Post

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या सफाई कामगाराच्या कुटुंबाला २ लाखांची आर्थिक मदत

Next Post

युनेस्कोचा मोठा सन्मान! गौतम बुद्धांच्या पहिल्या धर्मोपदेशाची भूमी ‘सारनाथ’ जागतिक वारसा स्थळ घोषित

Next Post
युनेस्कोचा मोठा सन्मान! गौतम बुद्धांच्या पहिल्या धर्मोपदेशाची भूमी ‘सारनाथ’ जागतिक वारसा स्थळ घोषित

युनेस्कोचा मोठा सन्मान! गौतम बुद्धांच्या पहिल्या धर्मोपदेशाची भूमी 'सारनाथ' जागतिक वारसा स्थळ घोषित

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी
बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चांवर निर्बंध घालणारा ठराव मागे घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलनाची...

Read moreDetails
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home