औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक १७ समता नगर आणि संसार नगर भागात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी मतदारांनी रॅलीला मोठा प्रतिसाद देत ‘एक संधी वंचितला’ देण्याचा निर्धार व्यक्त केला.

उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांना भेट
प्रचार रॅली दरम्यान सुजात आंबेडकर यांनी प्रभाग क्र. १७ चे उमेदवार आशुतोष नरवडे आणि पुष्पा काळे यांच्या मुख्य प्रचार कार्यालयांना भेट दिली. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांनी निवडणूक नियोजनाचा आढावा घेतला.
मुकुंदवाडीत सुजात आंबेडकरांच्या रॅलीला जनसागराचा प्रतिसाद; वंचितच्या उमेदवारांसाठी शक्तिप्रदर्शन

जाहीर सभेद्वारे मतदारांना आवाहन
रॅलीचा समारोप एका भव्य जाहीर सभेत झाला. यावेळी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधताना सुजात आंबेडकर म्हणाले की, “शहराच्या आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यायी राजकारणाची गरज आहे. वंचितांच्या हक्कासाठी आणि स्थानिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी आशुतोष नरवडे आणि पुष्पा काळे यांना भरघोस मतांनी विजयी करा.”

समता नगर आणि संसार नगर परिसरातून निघालेल्या या रॅलीमध्ये महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग होता. “आतापर्यंत सर्वांना पाहिले, आता वंचितांना संधी देऊ,” अशा भावना येथील मतदारांनी व्यक्त केल्या. या भव्य रॅलीमुळे प्रभाग १७ मध्ये वंचित बहुजन आघाडीने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.






