भूम – कोरोना महामारीच्या काळात प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने नळीवडगांव, गिरलंगाव, घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्या उपस्थित मास्क, सिनेटायजर वाटप करण्यात आले.कोरोना महामारी रोखण्यासाठी घरोघरी जाऊन कोरोना संर्दभात जनजागृती करून
कोरोना संसर्गाने अनेक गावात विळखा घातला आहे. त्या अनुषंगाने नळीवडगांव ग्रुप ग्रामपंचायत च्या वतीने मास्क व सिनेटायजर वाटप करण्यात आले.
कोरोना महामारी संर्दभात समाजप्रबोधन करून तिन्ही गावातुन कोरोना हाद्दपार करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. याप्रसंगी सरपंच प्रियंका रणबागुल, उपसरपंच अश्विनी वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य कालिदास पाटील, ज्ञानेश्वर राऊत,नवनाथ महानवर, रोहिदास लोकरे, आश्रुबा भोजने, ग्रामसेवक मुंडे आदी उपस्थित होते.