भारतीय स्त्री मुक्ती परिषदेला हजारो महिलांची उपस्थिती
अकोला : सर्व क्षेत्रात महिलांचा सहभाग हा लक्षणीय आहे. आज राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये महिलांची प्रगती हि गौरवास्पद बाब आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील निकालावरुन अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात राजकीय क्षेत्रात महिलांचे स्थान महत्वाचे आहे. तरीही काम करतांना महिलांना अजुनही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे महिलांनी संघटीत होऊन दृष्टी प्रवृत्तींशी लढण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष निशाताई शेंडे यांनी केले. त्या रविवारी वंचित बहुजन महिला आघाडी आयोजित भारतीय स्त्री मुक्ती परिषदेच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बोलत होत्या.
स्थानिक रामदास पेठ स्थित आबासाहेब खेडकर सभागृह येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने रविवारी “भारतीय स्त्री मुक्ती परिषदेचे” आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रभाताई शिरसाट या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन निशाताई शेंडे यांची उपस्थिती होते. कार्यक्रमाच्या उद्घाटक वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट यांनी जातीअंताचा लढा मजबूत करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तसेच आज जिल्हा परिषदेमध्ये ९९ टक्के महिला पदाधिकारी असल्याने खऱ्या अर्थाने महिलांना राजकीय पटलावर स्थान देऊन सक्षम करण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करीत असुन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिलांना गरजेच्या असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रभाताई शिरसाट यांनी अध्यक्षीय भाषणातुन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना मनुस्मृतीचे दहन करुन मुक्त केले त्यामुळेच स्त्री परिषद हा प्रत्येकाने सण म्हणुन साजरा करावे असे आवाहन जिल्हा महासचिव शोभाताई शेळके यांनी केले. भारतीय स्त्री मुक्ति परिषदेमध्ये सात वेगवेगळे ठराव मांडण्यात आले. कार्यक्रमात नवनियुक्त महिला सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर निशा शेंडे, अरुंधती शिरसाट, प्रभाताई शिरसाट, शोभा शेळके, प्रा. अनिता गवई, मिलिंद इंगळे, जि.प.अध्यक्षा संगिता अढाऊ, उपाध्यक्ष सुनिल फाटकर, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन, शिक्षण सभापती माया नाईक, कृषी पशुसंवर्धन सभापती योगीता रोकडे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष पी.जे.वानखडे, पुष्पाताई इंगळे, प्रतिभाताई अवचार, पंचायत समिती सभापती आम्रपाली गवारगुरु, सुनिता टप्पे, आम्रपाली तायडे, शारदा सोनटक्के, राजकन्या कवळकार, जि.प.सदस्या निता गवई, प्रमोदिनी कोल्हे, शंकर इंगळे, पंचायत समिती गटनेत्या मंगला शिरसाट, आकाश शिरसाट, प्रतिभा भोजने, मंदा कोल्हे, किरण बोराखडे, सुवर्णा जाधव निलोफर शाह, आशाताई अहिरे, सुरेखा सावदेकर, छाया तायडे, सरला मेश्राम, योगिता वानखडे यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्यांसह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्णा जाधव यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. मंतोषी मोहोड व प्रतिभा अवचार यांनी तर आभार संगीता खंडारे यांनी मानले. परिषदेला हजारोंच्या संख्येने वंचित बहुजन महिला आघाडीच्या पदाधिकारी व महिलांची उपस्थित होत्या.