Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home विशेष

Makiko Oya

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
August 8, 2022
in विशेष
0
Makiko Oya
       

२००१ सालचा एप्रिल महीना होता. भारिपचे केंद्रीय सचिव डि. एन. खंडारे ह्यांनी त्या वेळचे जिल्हाध्यक्ष दिलीप तायडे ह्यांना कॉल केला .”मुंबईहून कोणीतरी पत्रकार बाई आली , तिले भारिपची माहिती पाहिजे. बाळासाहेबांना भेटून आली ते , सुविधा हॉटेलात जा न भेटा आणि माहिती द्या ” मी त्या वेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख होतो. “हॉटेल सुविधा मध्ये जायचे पत्रकार बाई ला भेटायला जायचे, लवकर या”, असा आदेश दिलीपभाऊ ने मला दिला. मी तातडीने ढगेकर कॉम्प्लेक्स बेसमेंट मधील भारिपच्या जिल्हा कार्यालयात गेलो. अलमारीतल्या निवडणुक आकडेवारी आणि माहितीच्या फाईल सोबत घेऊन दोघे निघालो. महिला पत्रकार आहे म्हणजे लोकसत्ता किंवा एखादा नॅशनल चॅनेल कडून असेल, असा आमचा कयास होता. सुविधा हॉटेल मध्ये पोहचलो आणि रिसेप्शन वर चौकशी केली तर तिथे कुणीही पत्रकार आणि त्यातल्या त्यात महिला पत्रकार नसल्याची माहिती मिळाली. आमच्या उत्साहावर विरजण पडले. दिलीपभाऊंनी डि. एन. साहेबांना कॉल केला. “का हो दादा इकडे तं कोणीच नाही, हॉटेलवाले तं सांगतात की कोणी पत्रकार बाई नाही, सुविधा हॉटेलच सांगतली होती ना ?” तिकडे डि. एन. साहेबांचा केंद्रीय सचिव जागा झाला. त्यांनी दिलीपभाऊला जे सांगितले त्याचा तपशील काही शब्दशः लिहीत नाही. परंतु मतितार्थ होता की सुविधा हॉटेल च्या लँडलाईन वरून कॉल होता, पत्रकार बाई तिकडे आहे, बरोबर विचारा ! आम्ही परत डि. एन. साहेबांच्या कॉलचा संदर्भ दिला तेंव्हा रिसेप्शन वरील मुलीने आमच्या कडे कटाक्ष टाकला आणि ” सर बसा मॅडम ना बोलवतो ” आम्ही बसलो . पाणी आले आणि तिने कॉल केला , “गुड इवनिंग मॅम युवर गेस्ट आर वेटींग एट रिसेप्शन” तिने इंग्रजीत निरोप दिल्याने आम्हाला खात्री झाली मॅडम मोठ्या पेपरची किंवा न्युज चॅनेलची असेल. “पातोडे बरोबर सांगजा, आपली दखल वरच्या लेवल वर घेऊन राह्यले”. मी मान डोलवली.

तेवढ्यात एक नेपाळी चेहरेपट्टी असलेली एक तरूणी खाली आली. बाई नेपाळ्यासारखी असल्याने आम्हाला समजलं की इंटरव्युव हिंदीत होणार. आम्ही उभे राहिलो. तिने छान स्माईल दिले. दिलीपभाऊंनी नमस्कार करून हिंदीत स्वतःचा परिचय दिला. ते भारिपचे जिल्हाध्यक्ष असून मी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आहे. डि. एन. दादांनी सांगितले की आपल्याला भारिपची माहिती हवी म्हणून आलोय. बाई जागेवर थबकली. तिने ”सॉरी” म्हणत “Didn’t get you” असे बोलली. तिने सुरुवात इंग्रजीत केल्याने दिलीपभाऊंची बोबळी वळली. त्यांनी माझ्या कडे पाहिले. मी सुरुवात केली . .”Myself Rajendra Patode. I am publicity chief of Bharip and he is Mr. Dilipbhau Tayde our district president. D.N. saheb told that u want some information about bharip..” पुढचे मी काही बोलण्या आधी तिने आम्हाला बसायला सांगितले. आणि स्वतःचा परिचय दिला. तिचे नाव Makiko Oya असून ती जपान वरून आली आहे. टोक्यो विद्यापिठात ती पी. एच. डी. करीत आहे. जगातील विविध मागास जाती आणि त्यांची राजकीय, सामाजिक स्थित्यंतरे, हा तिचा डॉक्टरेट साठीचा विषय. आम्ही दोघेही हैराण ! ज्या बाईला आम्ही नेपाळी समजत होतो ती जपान वरून आली होती. बाबासाहेबांच्या अनटचेबल्स च्या संदर्भातील कार्याने प्रभावीत होऊन ती भारतात आली होती. रा सू गवई, रामदास आठवले आणि कवाडे सर ह्या नेते मंडळींना ती आवर्जून भेटली. अॅड बाळासाहेब आंबेडकरांच्या भेटी नंतर तिला खरे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे कार्य, अस्पृश्योध्दाराचा लढा, राज्यघटना आणि बौध्द धम्म स्विकार आणि आजचा भारिप बमसं अस्सलिख्खीत इंग्रजीत समजले . बाबासाहेबांचे नातू त्यांची राजकीय, सामाजिक चळवळीला ख-या अर्थाने अकोल्यात रूजविण्याचे कार्य करीत असल्याने ती अकोल्यात आली होती. दिलीपभाऊ ने परत पाणी घेतले. अखंड इंग्रजीत कुणीतरी प्रथमच त्यांच्या सोबत बोलत होते. केंद्रिय सचिव असलेल्या डि. एन. साहेबांनी नॅशनल पातळीवर असलेल्या पत्रकार महिलेला न भेटता आम्हाला हा सन्मान का दिला, ह्याचा खुलासा माकीको ओया हिच्या भेटी नंतर मला झाला. मुळात ती पत्रकार नसून संशोधक आहे हे त्यांना कळालेच नसावे. त्यात ज. वि. पवारांनी त्यांचा नंबर दिल्याने माकीको ने त्यांना मुंबईतून निघताना कॉल केला होता. इंग्रजीची ब्याद नको म्हणून ह्या कामगिरी वर त्यांनी दिलीपभाऊची रवानगी केली होती.

चहा घेऊन दिलीपभाऊंनी सर्व माहिती बरोबर द्या, असे सांगून ते रवाना झाले. त्या नंतर दोन दिवस मी तिला अकोल्यातील राजकीय, सामाजिक चळवळीतील माहिती आकडेवारीसह देत होतो. ह्या कामी माझा मित्र राजेश राकेश ह्याची चारचाकी घेउन तिला आपल्या वस्त्या पण दाखविल्या. पुढील दोन दिवस भारिपच्या एकाही पदाधिका-यांनी संपूर्ण दोन दिवस संपर्क केला नाही. ती दुसऱ्या दिवशी मुंबईला परतली. त्या नंतर तब्बल दिड महिन्या नंतर अचानक हवाई डाकेने बुध्दाचा फोटो असलेला जपानी पोस्ट कार्ड आले. मी त्या वेळी कृषी नगरला राहत होतो .जपानचा स्टँप पाहून पोस्टमन मला शोधत घरी आला. पोस्ट कार्ड माकीको ओया हिचे होते. २१ मे २००१ ला तिने हे कार्ड लिहिले होते .

Makiko Oya,
29 – 2,
Maigi chiyadamachi,
Quarangun Gumma – Japan
असा पत्ता होता. “मी कसा आहे, बरा असेल. तिला जपानला जाऊन महिना उलटला असून प्रत्र लिहायला उशीर झाल्याने दिलगीरी व्यक्त केली होती. मी केलेल्या मदती बद्दल आभार व्यक्त करून पुढील भारत भेटीच्या वेळी नक्की भेटेल, असे नमूद केले आहे.” विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा अभ्यास करण्यासाठी आलेली संशोधक विधार्थ्यीनी अकोला पॅटर्न अभ्यासण्यासाठी अकोल्यात येते. ही अनुभूतीच विलक्षण आहे . २० वर्षे आधी भारिप आणि अकोला जिल्हा आंतरराष्ट्रीय संशोधनाचा विषय ठरतो व त्याचा मी एक महत्वपुर्ण घटक होतो ह्याचा मला सार्थ अभिमान वाटतो.

@ राजेन्द्र पातोडे
प्रदेश महासचि
ववंचित बहुजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
9422160101

#भारिप #वंचीत #Balasaheb #सत्यकथा #VBA #VBA2022 #संशोधन #आंबेडकरी-चळवळ #Makiko oya #japan #जपान


       
Tags: AkolaPrakash Ambedkar
Previous Post

वंचित बहुजन आघाडी पुसद शहर व यवतमाळ जिल्हा पश्चिम संयुक्त कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

दस्तऐवज चळवळीचा : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तिरंगा का फडकवत नाही?” खा. बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रश्नाने लोकसभेत गोंधळ

Next Post
बाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई

दस्तऐवज चळवळीचा : "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तिरंगा का फडकवत नाही?" खा. बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रश्नाने लोकसभेत गोंधळ

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नवी दिल्लीतील लाल किल्याजवळ भीषण स्फोट; दहा जणांचा मृत्यू, घातपाताचा संशय
बातमी

नवी दिल्लीतील लाल किल्याजवळ भीषण स्फोट; दहा जणांचा मृत्यू, घातपाताचा संशय

by mosami kewat
November 10, 2025
0

नवी दिल्ली: राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज सायंकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. लाल किल्याजवळ सायंकाळी ६.५२ मिनिटांनी भीषण स्फोट झाला. या...

Read moreDetails
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे मोहन भागवत यांना थेट आव्हान!

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे मोहन भागवत यांना थेट आव्हान!

November 10, 2025
Akola : वंचित बहुजन युवा आघाडीच्या दणक्याने जिल्हा परिषदेची काम वाटप सभा रद्द!

Akola : वंचित बहुजन युवा आघाडीच्या दणक्याने जिल्हा परिषदेची काम वाटप सभा रद्द!

November 10, 2025
धाराशिव शहरातून वंचित बहुजन आघाडीला नवे बळ ; भीम आर्मीचे नेते भैय्यासाहेब नागटिळे वंचितमध्ये !

धाराशिव शहरातून वंचित बहुजन आघाडीला नवे बळ ; भीम आर्मीचे नेते भैय्यासाहेब नागटिळे वंचितमध्ये !

November 10, 2025
'साडी'वर निषेध! डॉ. संपदा मुंडे प्रकरणावरून अकोल्यात वंचित महिला आघाडीचा रुपाली चाकणकरांविरोधात एल्गार

‘साडी’वर निषेध! डॉ. संपदा मुंडे प्रकरणावरून अकोल्यात वंचित महिला आघाडीचा रुपाली चाकणकरांविरोधात एल्गार

November 10, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home