Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Maharashtra State Road Transport Corporation : प्रवाशांना दिलासा! १५ ऑगस्टपासून ‘लालपरी’चे लाईव्ह लोकेशन पाहता येणार

mosami kewat by mosami kewat
June 24, 2025
in बातमी, विशेष, सामाजिक
0
Maharashtra State Road Transport Corporation : प्रवाशांना दिलासा! १५ ऑगस्टपासून 'लालपरी'चे लाईव्ह लोकेशन पाहता येणार

Maharashtra State Road Transport Corporation : प्रवाशांना दिलासा! १५ ऑगस्टपासून 'लालपरी'चे लाईव्ह लोकेशन पाहता येणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अर्थात एसटी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.आता एसटीसाठी तासन्तास वाट पाहण्याचा अनावश्यक त्रास कायमचा संपणार आहे. येत्या १५ ऑगस्टपासून प्रवाशांना त्यांच्या लाडक्या ‘लालपरी’चे लाईव्ह लोकेशन पाहता येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. (Maharashtra State Road Transport Corporation)

लाईव्ह लोकेशन कसे तपासणार?

प्रवाशांनी काढलेल्या तिकिटावरील ट्रिप कोड वापरून एसटीच्या ॲप्लिकेशनमध्ये बसचे लाईव्ह लोकेशन तपासता येणार आहे. या ॲपमध्ये प्रवाशांना केवळ त्यांच्या बसचेच नव्हे, तर इतर मार्गांवरील गाड्या, त्यांची वेळ आणि थांबे यांचीही माहिती उपलब्ध होईल. यासाठी मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयात एक अद्ययावत नियंत्रण कक्ष (Control Room) स्थापन करण्यात आला आहे. (Maharashtra State Road Transport Corporation)

प्रवाशांची सोय व्हावी यासाठी एसटी बसेसमध्ये जीपीएस (GPS) बसवण्याचे आणि ॲप्लिकेशन तयार करण्याचे कंत्राट कोरोना साथीच्या आधीच एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. २०१९ मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हे ॲप्लिकेशन लाँच केले होते.

हे काम सहा महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र ते अद्याप पूर्ण झाले नव्हते. आतापर्यंत १२ हजार बसेसमध्ये जीपीएस बसवण्यात आले आहे. सध्या राहिलेल्या उर्वरित बसेसमध्ये ते बसवण्याचे काम सुरू आहे. एसटी महामंडळाने या संदर्भात एक पत्रिका देखील प्रसिद्ध केली आहे. (Maharashtra State Road Transport Corporation)

ज्यामध्ये एसटी तिकिटावरील क्रमांकावरून बस एसटी स्टँडवर येण्याची नेमकी वेळ कळणार असल्याचे नमूद केले आहे. या सुविधेमुळे एसटी प्रवास अधिक सुरक्षित, परवडणारा आणि आता अधिक सोयीस्कर होईल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

Tags: CorporationlalpariMaharashtrastateTransport
Previous Post

“युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला! इस्राइल-इराण संघर्ष आटोपला, पण अखेरच्या हल्ल्यात इराणचा इशारा ठळक”

Next Post

जुन्नरमधील रहस्यदाट मृत्यू प्रकरण! श्रीगोंद्याच्या तलाठीसह कॉलेज तरुणीचा मृतदेह सापडला;रिव्हर्स वॉटरफॉलजवळ चपला आढळल्याने खळबळ

Next Post
जुन्नरमधील रहस्यदाट मृत्यू प्रकरण! श्रीगोंद्याच्या तलाठीसह कॉलेज तरुणीचा मृतदेह सापडला — रिव्हर्स वॉटरफॉलजवळ चपला आढळल्याने खळबळ

जुन्नरमधील रहस्यदाट मृत्यू प्रकरण! श्रीगोंद्याच्या तलाठीसह कॉलेज तरुणीचा मृतदेह सापडला;रिव्हर्स वॉटरफॉलजवळ चपला आढळल्याने खळबळ

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home