Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

mosami kewat by mosami kewat
September 16, 2025
in बातमी, राजकीय
0
Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

मुंबई : महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्य सरकारला या निवडणुका घेण्यासाठी 31 जानेवारी 2026 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह राज्यातील इतर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, ही मुदत आता संपत आली असूनही एकाही ठिकाणी निवडणूक झाली नाही. त्यामुळे मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला या दिरंगाईबद्दल जाब विचारला. (Local Bodies Election Supreme Court)

राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडताना कर्मचाऱ्यांची कमतरता, सणांचा हंगाम आणि ईव्हीएम यंत्रांची अनुपलब्धता यांसारखी कारणे देण्यात आली. तसेच, प्रभाग रचनेचे काम सुरू असून या प्रक्रियेला वेळ लागत असल्याचेही निवडणूक आयोगाने सांगितले.

ही सर्व कारणे ऐकल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला निवडणुका पूर्ण करण्यासाठी 31 जानेवारी 2026 पर्यंतची अंतिम मुदत दिली. त्यामुळे आता या वेळेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. (Local Bodies Election Supreme Court)

Tags: Electionmunicipal corporationsmunicipalitiesPoliticalstate governmentsupreme courtVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाची छापेमारी; कोहिनूर आणि मित्तल ग्रुपवर छापे

Next Post

Nashik : वंचितांना न्याय देणे हाच खरा आंबेडकरवाद! – चेतन गांगुर्डे

Next Post
Nashik : वंचितांना न्याय देणे हाच खरा आंबेडकरवाद! – चेतन गांगुर्डे

Nashik : वंचितांना न्याय देणे हाच खरा आंबेडकरवाद! – चेतन गांगुर्डे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
फक्त ध्वजारोहणासाठी पालकमंत्री नकोत; जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हवेत : वंचित बहुजन आघाडी
बातमी

फक्त ध्वजारोहणासाठी पालकमंत्री नकोत; जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हवेत : वंचित बहुजन आघाडी

by mosami kewat
August 15, 2026
0

कळमनुरी : स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ कळमनुरी तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात निषेध...

Read moreDetails
कळमनुरी: वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे मूकबधिर विद्यालयात फळवाटप करून स्वातंत्र्यदिन साजरा

कळमनुरी: वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे मूकबधिर विद्यालयात फळवाटप करून स्वातंत्र्यदिन साजरा

August 15, 2026
कुर्ला येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे स्थानिक महिलांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

कुर्ला येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे स्थानिक महिलांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

August 15, 2026
वंचित बहुजन महिला आघाडीच्या वळसंग (दक्षिण सोलापूर) शाखेचे उत्साहात उद्घाटन

वंचित बहुजन महिला आघाडीच्या वळसंग (दक्षिण सोलापूर) शाखेचे उत्साहात उद्घाटन

August 15, 2026
शाळा नको, महापौरांचा बंगला विका : वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

शाळा नको, महापौरांचा बंगला विका : वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

August 15, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home