लंडन : युरोपच्या शांततेला पुन्हा एकदा सुरुंग लागलेला दिसतो आहे. फ्रान्सनंतर आता ब्रिटनची राजधानी लंडनही आंदोलनाच्या आगीत धुमसू लागली आहे. मागील आठवड्यात फ्रान्समध्ये राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले होते आणि आता लंडनमध्ये स्थलांतरविरोधी (Anti-Immigration) निदर्शनांनी हिंसक वळण घेतले आहे.
गेल्या शनिवारी लंडनच्या रस्त्यावर एक ऐतिहासिक मोर्चा निघाला. यामध्ये एक लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व टॉमी रॉबिन्सन यांनी केले. ‘युनायटेड द किंगडम मार्च’ असे या मोर्चाचे नाव होते. या मोर्चातील आंदोलक सुरुवातीला शांत होते, पण नंतर त्यांनी पोलिसांवर थेट हल्ला करण्यास सुरुवात केली. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले असून, नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
या मोर्चातील एक विशेष गोष्ट म्हणजे, आंदोलकांच्या हातात ‘सेंड देम होम’ लिहिलेले फलक होते आणि अनेकांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रसिद्ध ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या मोहिमेच्या टोप्या घातल्या होत्या. यावरून असे दिसते की, स्थलांतरविरोधी भावना केवळ युरोपमध्येच नव्हे, तर जगभरात वाढत आहेत.
याचवेळी, ‘स्टँड अप टू रेसिझम’ या दुसऱ्या मोर्चाचे आयोजनही करण्यात आले होते, ज्यामध्ये सुमारे पाच हजार लोक सहभागी झाले होते. पोलिसांनी दोन्ही मोर्चे एकमेकांपासून वेगळे ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलांची मदत घेतली, ज्यात घोडेस्वार पथकेही सामील होती.
“स्मार्ट सिटी” की “हेल्दी सिटी”?
संजीव चांदोरकर सौंदर्यप्रसाधने चोपडलेला चेहरा ही संपूर्ण शरीर आरोग्य संपन्न ? (आरोग्य संपन्न शरीर असणाऱ्या स्त्री-पुरुषांचा चेहरा देखील चमकदार असतो)...
Read moreDetails