नाशिक : नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या प्रांगणात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी वकिल संघाने केली आहे. याला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, नाशिक येथील वकिलांच्या संघटनेने ही मागणी उचलून धरली आहे. बाबासाहेब आंबेडकर हे काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या निमित्ताने अनेकदा नाशिक येथे येत होते. या काळात त्यांनी येथील न्यायालयात वकिलीचा सराव (प्रॅक्टिस) देखील केला होता. असे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून डॉ. आंबेडकरांनी देशाच्या न्यायव्यवस्थेसाठी पायाभूत कार्य केले आहे. त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी वकिलांच्या संघटनेने केलेली मागणी विचारात घेऊन हा पुतळा लवकरच उभारण्यात यावा, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.
जनसागर उसळला : प्रभाग २४ मध्ये वंचित बहुजन आघाडीची शक्तीप्रदर्शन; अंजलीताई आंबेडकरांची जाहीर सभा उत्साहात
औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबिकानगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या...
Read moreDetails






