Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आई-बहिणीवरून शिवी दिली तर ५०० रुपये दंड; कोळगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय!

mosami kewat by mosami kewat
March 9, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
आई-बहिणीवरून शिवी दिली तर ५०० रुपये दंड; कोळगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय!
       
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव ग्रामपंचायतीने महिलांच्या सन्मानासाठी एक ठोस आणि वेगळा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात सहजपणे वापरल्या जाणाऱ्या आई-बहिणींवरून दिल्या जाणाऱ्या शिव्यांना आळा घालण्यासाठी ग्रामसभेत थेट आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रविवारी कोळगाव येथे विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महिलांनी गावातील सामाजिक वातावरणाबाबत चर्चा करत महिलांचा अपमान करणाऱ्या शिवीगाळीच्या प्रकारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर उपाय म्हणून गावात कोणीही आई-बहिणींवरून शिवी दिल्यास त्या व्यक्तीकडून ५०० रुपयांचा दंड वसूल करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. (Kolgaon Gram Panchayat)

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी व्हिडिओ पुराव्याची अट ठेवण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीने शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ ग्रामपंचायतीकडे सादर झाल्यास त्याच्याकडून दंड आकारण्यात येणार आहे. महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे गावकऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. (Kolgaon Gram Panchayat)

दरम्यान, गाव स्वच्छतेबाबतही ग्रामसभेत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. गावातील घर, दुकान किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याचे फोटो ग्रामपंचायतीकडे सादर झाल्यास संबंधित व्यक्तीकडून १०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच गावात व्यसनमुक्ती आणि महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धारही या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Tags: ahmadnagarKolgaon Gram PanchayatMaharashtraPoliticalVillage
Previous Post

इराण–इस्रायल संघर्षाची झळ भारतात; एलपीजी वापरावर प्राधान्य, काही गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद

Next Post

आदिवासी भागातील संघर्षाला यशाची जोड; हेमकृष्ण पिसदे यांचा UPSC मध्ये झेंडा!

Next Post
आदिवासी भागातील संघर्षाला यशाची जोड; हेमकृष्ण पिसदे यांचा UPSC मध्ये झेंडा!

आदिवासी भागातील संघर्षाला यशाची जोड; हेमकृष्ण पिसदे यांचा UPSC मध्ये झेंडा!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी; नियोजनाच्या अभावावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संताप
बातमी

गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी; नियोजनाच्या अभावावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संताप

by mosami kewat
March 29, 2026
0

अकोला : गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे आज एक दुर्दैवी घटना घडली असून वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव सिरसाठ यांचा...

Read moreDetails
पुण्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद ; ओबीसी प्रश्नांवर ठाम भूमिका,ओबीसी नेत्यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला लवकरच भेटणार

पुण्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद ; ओबीसी प्रश्नांवर ठाम भूमिका,ओबीसी नेत्यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला लवकरच भेटणार

March 28, 2026
IPL २०२६ चा बिगुल वाजला! आज चिन्नास्वामीवर रंगणार आरसीबी विरुद्ध हैदराबादचा महासंग्राम

IPL २०२६ चा बिगुल वाजला! आज चिन्नास्वामीवर रंगणार आरसीबी विरुद्ध हैदराबादचा महासंग्राम

March 28, 2026
अशोक खरात प्रकरण हिमनगाचे टोक : अशोक खरात या प्रकरणातील मोठा साक्षीदार; कोठडीत त्याच्या जीविताला धोका!

अशोक खरात प्रकरण हिमनगाचे टोक : अशोक खरात या प्रकरणातील मोठा साक्षीदार; कोठडीत त्याच्या जीविताला धोका!

March 28, 2026
अंबडमध्ये भटके-विमुक्तांचा जनआक्रोश मोर्चा; जनगणनेत स्वतंत्र कॉलमची मागणी

अंबडमध्ये भटके-विमुक्तांचा जनआक्रोश मोर्चा; जनगणनेत स्वतंत्र कॉलमची मागणी

March 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home