केरळातील एका विद्यार्थ्याचे वडील आपल्या पत्नीची इतरांना ओळख करून देताना सांगायचे. परंतु हा मुलगा मात्र आपल्या आईला सतत कुठल्या ना कुठल्या कामात गर्क असलेला पहायचा, म्हणून त्यानं आपली आई विविध कामात गर्क असतानाचे पेंटींग काढले व त्याला शिर्षक दिले – ‘माझी आई व इतर शेजारच्या आया.
अनुजथ सिंधु विनायल असं या मुलाचं नाव. तो केरळच्या त्रिसुरमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकतो. त्याचं हे चित्र पाहून त्याचे शिक्षक इतके चकीत झाले की त्यांनी ते सरकारी कार्यालयाकडे पाठवून दिले. या चित्रात त्यानं महिलांच्या विविध घरकामांची दखल घेतली आहे.
हे पेंटींग केरळ सरकारच्या २०२०-२०२१ च्या जेंडर बजेट डॉक्युमेंट कव्हर म्हणून निवडले गेले आहे.
सलाम आईंना सलाम तिच्या लेकराला! सलाम शिक्षकांना! सलाम केरळ सरकारला! – शांताराम पंदेरे
“माझी बायको काहीच करत नाही”
ती घरी असते इतकेच!
केरळच्या एका विद्यार्थ्याचे वडील इतरांना आपल्या बायकोची ओळख अशी करून द्यायचे. मात्र तिचा नववीतील मुलगा पाहत असे आपली आई सतत कोणते ना कोणते काम करताना. म्हणून त्याने काढली आईच्या विविध कामांची चित्रं. आणि त्याला नांव दिले “माझी आई आणि शेजारच्या बाया”
या मुलाचे नांव अजयथ सिंधू विनायल. शिकतो केरळच्या त्रिशूर शाळेत. पाठवले हे चित्र शिक्षकाने केरळ सरकारकडे. प्रसिद्ध केले साम्यवादी विचारांच्या केरळ सरकारने. हे चित्र 2020-21 च्या जेंडर बजेट” चे कव्हर पेज आहे.