Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘प्रबुद्ध भारत’ चे वृत्तसंपादक जितरत्न पटाईत यांची वंचित च्या सोशल मीडिया प्रमुख पदी नियुक्ती !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 9, 2024
in बातमी
0
‘प्रबुद्ध भारत’ चे वृत्तसंपादक जितरत्न पटाईत यांची वंचित च्या सोशल मीडिया प्रमुख पदी नियुक्ती !
       

मुंबई: प्रबुद्ध भारत या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक पाक्षिकाच्या ‘वृत्तसंपादक’ पदाची धुरा आपल्या खांद्यावर पेलून आंबेडकरी विचार घरा – घरांत घेऊन जाण्याचा निर्धार करणारे जितरत्न पटाईत यांची वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी समाजमाध्यमांवर जाहीर केले.

जितरत्न पटाईत हे विदयार्थीदशेतच मालेगाव येथून पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी आले असताना त्यांनी पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. येथील शिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी टाटा मोटर्स येथे नोकरी देखील करत होते. आंबेडकरी विचारांना घराघरात घेऊन जाण्यासाठी 2017 मध्ये प्रबुद्ध भारतचे संपादक तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाने प्रबुद्ध भारतच्या उपसंपादक तथा वृत्तसंपादक पदी त्यांनी कार्य सुरू केले आणि प्रबुद्ध भारतला पुन्हा जिवंत करण्याचे कार्य केले.

वंचित बहुजन आघाडी हा पक्ष राज्यातील वास्तविक प्रश्नांवर लक्ष वेधत आहे. अन्यायग्रस्तांना न्याय द्यायचे कार्य करत आहे. अशावेळी सध्याच्या काळात समाज माध्यम खूप महत्वपूर्ण भूमिका बजावतात. म्हणून पक्षाने जितरत्न पटाईत यांच्यासारख्या तडफदार युवकाच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली. त्यांचं अभिनंदन आणि  पुढील वाटचालीस ‘प्रबुद्ध भारत’ मीडिया टीम कडून मनःपूर्वक  शुभेच्छा.


       
Tags: jitratnpataitprabuddha bharatSiddharth MokleVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ॲड.प्रकाश आंबेडकरांच्या संवाद सभांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद !

Next Post

समान किमान कार्यक्रमाच्या चर्चेसाठी ‘मविआ’ ने तारीख सुचवावी – प्रकाश आंबेडकर

Next Post
समान किमान कार्यक्रमाच्या चर्चेसाठी ‘मविआ’ ने तारीख सुचवावी – प्रकाश आंबेडकर

समान किमान कार्यक्रमाच्या चर्चेसाठी 'मविआ' ने तारीख सुचवावी - प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
“बिबट्याला घरातच कोंडलं अन् मुलाचा जीव वाचवला”; ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाला सलाम !
बातमी

“बिबट्याला घरातच कोंडलं अन् मुलाचा जीव वाचवला”; ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाला सलाम !

by Akash Shelar
May 16, 2026
0

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खरशिंदे गावात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाची...

Read moreDetails
आंबेडकरी कार्यकर्ते डॉ. राहुल ससाणे यांना गप्प करण्याचा प्रयत्न? विद्यापीठ प्रशासनाची कारवाई !

आंबेडकरी कार्यकर्ते डॉ. राहुल ससाणे यांना गप्प करण्याचा प्रयत्न? विद्यापीठ प्रशासनाची कारवाई !

May 14, 2026
देश आणि राज्यातील परीक्षा घोटाळ्याचा अमृतकाळ !

देश आणि राज्यातील परीक्षा घोटाळ्याचा अमृतकाळ !

May 14, 2026
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले ‘भूमिका’ नाटकाचे कौतुक

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले ‘भूमिका’ नाटकाचे कौतुक

May 13, 2026
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते

May 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home