मुंबई : वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश महासचिव रामकला मगर यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम लोकप्रिय हास्यकलाकार व सिने अभिनेता गौरव मोरे यांना संविधान सन्मान महासभेसाठी आमंत्रण प्रदान केले.
आगामी महासभेच्या तयारीचा एक भाग म्हणून आयोजित या निमंत्रण भेटीत जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम जोगदंड, जोगेश्वरी तालुका समन्वयक सुनिल घायतडक, वॉर्ड क्र. 121 चे वॉर्ड समन्वयक मोहन अंभीरे, महिला वॉर्ड समन्वयक तसेच गौरव मोरे यांच्या मातोश्री शारदाताई मोरे आणि महिला वॉर्ड उपाध्यक्षा दीपाताई भालेराव उपस्थित होते.
कापूरवाडीत महार वतनाच्या जागेवर अवैध उत्खनन; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन
या भेटीदरम्यान संस्थेच्या कार्यकर्त्यांनी संविधान मूल्यांचे जतन, सामाजिक समता, सांस्कृतिक जागरूकता आणि समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांवर रचनात्मक संवादाची गरज व्यक्त केली. गौरव मोरे यांनी मिळालेल्या सन्माननीय निमंत्रणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सामाजिक कार्यात सकारात्मक सहभागाचे संकेत दिले.





