पंढरपूर : वंचित बहुजन युवा आघाडी, सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने आज पंढरपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ युवा तालुका व शहर कार्यकारिणीच्या निवडीसाठी मुलाखती घेण्यात आल्या. या बैठकीत युवा आघाडीच्या संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा जिल्हा महासचिव मा. दीपसागर पाराध्ये, ॲड. दत्तात्रय कापुरे (सचिव), सोमनाथ ढावरे (सचिव), युवा जिल्हा उपाध्यक्ष मा. प्रशांत जगताप आणि सत्यवान चंदनशिवे प्रमुख उपस्थित होते.
या मुलाखत सत्रास जिल्हा उपाध्यक्ष वैभव भंडारे, रवी सर्वगोड, राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष दीपक माने, पंढरपूर शहर अध्यक्ष राजाभाऊ शिंदे, मंगळवेढा शहर अध्यक्ष अजय गाडे, पंढरपूर महासचिव महेश रणदिवे, तानाजी कांबळे, भारत कसबे, लखन शिकतोडे यांच्यासह सर्व युवा आजी-माजी तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मुलाखतींद्वारे पंढरपूर तालुका आणि शहर स्तरावर युवा आघाडीला अधिक बळकट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; महिलांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
मुंबई : महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत पात्र महिलांना घरगुती वापरासाठी आवश्यक असलेले साहित्य वाटप न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने...
Read moreDetails