अकोला: वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते, सुजात आंबेडकर यांच्या हस्ते बाळापुर तालुक्यामधील वेगवेगळ्या गावांमध्ये विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. रिधोरा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पेव्हर ब्लॉक कामांचे भूमिपूजन करण्यात आले. बुद्ध शासन विहार येथे बुद्ध विहाराची लायब्ररी बांधकाम पाहणी करण्यात आली. व्याळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यायामशाळा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे.
पारस येथे गावामध्ये विविध जिल्हा परिषद अंतर्गत वेगवेगळ्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यांचे कार्यक्रम पार पडले आहेत.
रिधोरा, व्याळा, देगाव, वाळेगाव, चिंचोली, तांदळी, बाळापुर नाका, बाळापुर, पारस मध्ये स्थानिक नागरिकांकडून जल्लोषात आणि मोठ्या उत्साहात सुजात आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव तथा प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे, जिल्हा मीडिया प्रमुख प्रशिक मोरे, अकोला जिल्हा उपाध्यक्ष सुबोध डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष निलेश इंगळे, जिल्हा सचिव मीनलताई मेढे, जिल्हा सचिव श्रीकृष्ण देवकुंभी, जिल्हा सचिव आनंद भाऊ खंडारे, जिल्हा सचिव आदित्य भाऊ इंगळे, युवा आघाडी बाळापुर तालुका अध्यक्ष संदीप भाऊ वानखडे, तालुका महासचिव सचिन रोहनकर, तालुका कोषाध्यक्ष शिवा हुसे, तालुका उपाध्यक्ष विशाल दंदी, तालुका सचिव आकाश सावळे, तालुका उपाध्यक्ष अक्षय साबळे, बाळापुर तालुका प्रसिद्धी प्रमुख रणजीत तायडे, तालुका उपाध्यक्ष राजदार खान, तालुका उपाध्यक्ष अमोल वानखडे, तालुका उपाध्यक्ष बुद्धदीप डोंगरे, समाज कल्याण सभापती आम्रपालीताई खंडारे, जिल्हा परिषद सदस्य प्रगती ताई दांदळे, माजी पंचायत समिती सभापती आणि पंचायत समिती सदस्य सौ. रूपालीताई गवई महिला आघाडी तालुकाध्यक्ष मा. अनुराधाताई डांगे तालुका महासचिव जाहेदाबी सर्कल अध्यक्ष रिता ताई हेरोळे, सर्कल महासचिव सविताताई वानखडे,सह. प्रसिद्धी प्रमुख विकास सदाशिव, तालुका महासचिव चंद्रकांत पाटील, तालुका कोषाध्यक्ष सादिक भाई, ज्येष्ठ नेते गजानन दांदळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
अविनाश खंडारे, धर्मेंद्र दंदी, गुलाब उमाळे, मंगेश गवई, देवानंद अंभोरे, वंचित बहुजन आघाडी तालुका पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी, महिला, वंचित बहुजन युवा आघाडी पदाधिकारी व तसेच व्याळा, देगाव, वाळेगाव, पारस सर्कल मधील आजी-माजी पदाधिकारी महिला पदाधिकारी युवा पदाधिकारी जेष्ठ कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.