अक्कलकोट (प्रतिनिधी):वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा झंजावात संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे, अनेक जिल्ह्यात मोठ्या मोठ्या सभा होत असून जनता स्वतःच्या खर्चाने हे सभा मोठ्या संख्येने यशस्वी करीत आहेत सध्याच्या वातावरणात वंचित बहुजन आघाडी या पक्षाला ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घेतल्याशिवाय कोणीही सत्तेच्या दारापर्यंत जाऊ शकत नाही, ही ताकद निर्माण झालेली आहे. प्रदेशाअध्यक्ष रेखा ताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि युवा नेते, सुजात साहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचितचा झंजावात चालू असताना त्याचाच एक भाग म्हणून अक्कलकोट वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तीन शाखेचे उद्घाटन एकाच दिवशी करण्यात आले.
1) तडवळ, येथे वंचित बहुजन युवक आघाडी शाखेचे उद्घाटन युवक आघाडी जिल्हाध्यक्ष पांडुरंग खांडेकर जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष रवी थोरात आणि जिल्हा संघटक जालिंदर चंदनशिवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
2) निमगाव, येथे वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मल्लिनाथ पाटील तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मढी खांबे युवक तालुका अध्यक्ष शिलामणी बनसोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
३) गौडगाव, येथे वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मालेगाव पाटील तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मढी खांबे, युवक आघाडी तालुका अध्यक्ष शिलामनी बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
वरील प्रमाणे बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांचे विचार सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्यासाठी आणि तळाजळात विचार रुजवण्यासाठी या तिन्ही शाखेचे सर्व पदाधिकारी अतिशय मेहनत घेऊन या शाखा उद्घाटन कार्यक्रम यशस्वी करून दाखवले .
याप्रसंगी सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ते रवी पोटे, तालुका संघटक बबन गायकवाड, आनंद मोरे, तालुका महासचिव नागेश् हरवाळकर, तालुका उपाध्यक्ष अमृत सोनकांबळे, शहराध्यक्ष विशाल ठोंबरे, शहर उपाध्यक्ष शिवाजी चौगुले, युवक आघाडी शहराध्यक्ष संदीप बाळशंकर, युवक आघाडी तालुका उपाध्यक्ष सोमनाथ धसाडे, सागर बनसोडे प्रदीप बनसोडे, युवक आघाडी तालुका संघटक हनुमंत जाधव, योगेश सोनकांबळे, आकाश गायकवाड, अमोल सोनकांबळे तडवळ शाखाध्यक्ष शरणाप्पा शिवशरण, मल्लू गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, संतोष कांबळे, निमगाव शाखा अध्यक्ष शेखर गायकवाड, उत्तम गायकवाड, श्याम गायकवाड, गौतम गायकवाड, संतोष गायकवाड, गौडगाव शाखा अध्यक्ष अण्णाप्पा सोनकांबळे, महासचिव शंकर कुरणे, संजय सोनकांबळे अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.