Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अनधिकृत बांधकाम प्रकरणात ईडीची मोठी कारवाई: माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी छापेमारी‎‎

mosami kewat by mosami kewat
July 29, 2025
in बातमी, राजकीय
0
अनधिकृत बांधकाम प्रकरणात ईडीची मोठी कारवाई: माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी छापेमारी‎‎
       
वसई-विरार : वसई-विरारमध्ये खळबळ! सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) वसई-विरार परिसरातील अनधिकृत बांधकामांशी संबंधित प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. कालच सत्कार आणि समारंभाचा कार्यक्रम झालेले वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह एकूण १२ ठिकाणांवर मंगळवारी सकाळी ईडीने छापेमारी केली.

या कारवाईमुळे वसई आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.‎‎मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई, पुणे, नाशिक, वसई आणि विरार येथील वेगवेगळ्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. यातील बहुतांश ठिकाणी टाकलेले छापे हे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

‎‎मंगळवारी पहाटेपासूनच ईडीने ही कारवाई सुरू केली असून, याबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती. एकाच वेळी १२ ठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली. पवार यांच्या निवासस्थानी सुरू असलेली कारवाई उशिरापर्यंत सुरू राहील, असे सूत्रांनी सांगितले. अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

Tags: ConstructionEDpoliceraids
Previous Post

SCERT च्या अभ्यासक्रमात मोठे बदल: तिसरी ते बारावीसाठी नवीन धोरण, व्यावसायिक शिक्षणावर भर

Next Post

‎’अ‍ॅग्रीस्टॅक’मुळे डिजिटल क्रांती: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता पीक कर्जासाठी कागदपत्रांची गरज नाही!‎‎

Next Post
‎’अ‍ॅग्रीस्टॅक’मुळे डिजिटल क्रांती: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता पीक कर्जासाठी कागदपत्रांची गरज नाही!‎‎

‎'अ‍ॅग्रीस्टॅक'मुळे डिजिटल क्रांती: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता पीक कर्जासाठी कागदपत्रांची गरज नाही!‎‎

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home