मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर आज, ६ एप्रिल २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे. “नरेंदर, कब मिलेंगा गॅस सिलेंडर?” या घोषणेसह हे आंदोलन जिल्हा व तालुका स्तरावर होणार आहे.
गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करत, या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. (Gas Cylinder Shortage)
Also Raad : Bribe Case : मंत्रालयात पुन्हा भ्रष्टाचाराचा स्फोट; ६ लाखांच्या लाचेसह कक्ष अधिकारी अटकेत!
राज्यभरातील विविध ठिकाणी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करण्याची प्रमुख मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे.






