विसापूर : बल्लारपूर तालुक्यात आज एक मोठा राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेस पक्षाशी दीर्घकाळ निष्ठेने काम करणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्या सुमनताई गौरकार यांनी आज काँग्रेसला रामराम ठोकत विसापुरात कार्यकर्त्या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.
सुमन गौरकार यांनी आपल्या प्रवेशावेळी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या विचारांवर चालणारा खरा बहुजनवादी पर्याय आज महाराष्ट्रात फक्त वंचित बहुजन आघाडीच आहे. समाजाच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि खऱ्या परिवर्तनासाठी आम्ही आता वंचितच्या झेंड्याखाली लढू.”
https://youtu.be/vmJsitz_nqE?si=jRK7uTOz4FCMWzLR
या प्रवेशामुळे बल्लारपूर तालुक्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल घडला असून, वंचित बहुजन आघाडीची ताकद आणखी बळकट झाली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्या मध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तावाडे, महिला जिल्हाध्यक्षा कविता गौरकार, तालुका अध्यक्ष, संजय वाघाडे, रुपचंद निमगडे, प्रकाश तोहगावकर, मधुकर उराडे, अँड अक्षय लोहकरे,
अभिलाष चुनारकर, सिद्धांत पुणेकर, सत्यभामा भाले, सुशीला नगराळे, वंदना पुणेकर, रिना कांबळे, अविनाश वाघमारे, नितीन रायपुरे, लोकचंद भोयर, किरण पुणेकर, कामेश मुन, आशिष तितरे, अनंत सुग्रीव वानखेडे, राजू बागेश्वर, मदन बुरुचुंडे, निलजय गावंडे, समीर शेख व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.






