Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

देशभरात एस्मा लागू! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत पुन्हा नियम बदलले! नवे नियम काय?

mosami kewat by mosami kewat
March 10, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
देशभरात एस्मा लागू! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत पुन्हा नियम बदलले! नवे नियम काय?
       

पश्चिम आशियात वाढलेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून त्याचा परिणाम भारतातही दिसू लागला आहे. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमती वाढत असतानाच केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या बुकिंगबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाने गॅस सिलिंडरच्या बुकिंगमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दोन बुकिंगमधील किमान कालावधी 21 दिवसांचा होता, तो आता वाढवून 25 दिवस करण्यात आला आहे. म्हणजेच ग्राहकांना दोन सिलिंडर बुकिंगदरम्यान किमान 24 दिवसांचे अंतर ठेवणे आवश्यक राहणार आहे. (ESMA imposed nationwide)

सरकारच्या म्हणण्यानुसार हा निर्णय ब्लॅक मार्केटिंग आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी घेण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशभरात अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा एस्मा (ESMA) लागू करण्यात आला आहे. भविष्यात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये आणि साठेबाजी थांबवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितले आहे.

दरम्यान, एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही अलीकडेच वाढ करण्यात आली आहे. 7 मार्चपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ झाली आहे, तर 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत 114.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. (ESMA imposed nationwide)

नवीन दरांनुसार दिल्लीमध्ये 14.2 किलोचा नॉन-सब्सिडी एलपीजी सिलिंडर 913 रुपयांना मिळत आहे. मुंबईमध्ये त्याची किंमत 912.50 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये हा सिलिंडर 939 रुपयांना मिळत असून चेन्नईमध्ये त्यासाठी 928.50 रुपये मोजावे लागत आहेत.

तसेच 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरची किंमत आता 1,883 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. याशिवाय आयात करण्यात येणाऱ्या एलपीजीचा वापर करताना घरगुती वापराव्यतिरिक्त रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना प्राधान्य देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.


       
Tags: americaIran - Israel warLPGMaharashtraVanchit Bahujan Aghadivbaforindiavbafotindia
Previous Post

​एपस्टीन फाईल्स वरून विरोधक आक्रमक; ऍड. प्रकाश आंबेडकर यांची आज महत्वाची बैठक 

Next Post

आरएसएस मुख्यालयावर २३ मार्चला धरणे आंदोलन; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

Next Post
आरएसएस मुख्यालयावर २३ मार्चला धरणे आंदोलन; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

आरएसएस मुख्यालयावर २३ मार्चला धरणे आंदोलन; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : कळमनुरीत वंचित बहुजन आघाडी कडून धरणे आंदोलनाची घोषणा; पोलिस प्रशासनाविरोधात संताप
बातमी

हिंगोली : कळमनुरीत वंचित बहुजन आघाडी कडून धरणे आंदोलनाची घोषणा; पोलिस प्रशासनाविरोधात संताप

by mosami kewat
April 3, 2026
0

हिंगोली : वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजु कांबळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ कळमनुरी येथे धरणे आंदोलनाची घोषणा करण्यात आली...

Read moreDetails
६ एप्रिलच्या राज्यव्यापी आंदोलनासाठी 'वंचित' सज्ज; संयुक्त बैठकीत रणनीती निश्चित

६ एप्रिलच्या राज्यव्यापी आंदोलनासाठी ‘वंचित’ सज्ज; संयुक्त बैठकीत रणनीती निश्चित

April 3, 2026
आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर

आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 3, 2026
Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

April 3, 2026
Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

April 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home