नांदेड : दंतचिकित्सा क्षेत्रातील विविध समस्या आणि मागण्यांबाबत महाराष्ट्रातील तसेच देशभरातील दंतशास्त्र (डेंटिस्ट) विद्यार्थ्यांनी एक निवेदन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
या निवेदनामध्ये विद्यार्थ्यांनी दंतचिकित्सकांना भेडसावणाऱ्या अनेक गंभीर अडचणींबाबत लक्ष वेधले असून शासनाने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.
निवेदनात मांडलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –
1) आपत्ती व्यवस्थापनासाठी वैद्यकीय आणीबाणीच्या काळात दंत शल्यचिकित्सकांना विशेष प्रशिक्षण द्यावे.
2) महागड्या दंत उपचारांसाठी स्वतंत्र “डेंटल इन्शुरन्स” योजना लागू करावी.
3) सर्व शासकीय विभागांमध्ये दंत शल्यचिकित्सकांना “हेल्थ ऑफिसर” पदावर नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.
4) दंत शल्यचिकित्सकांचा वेतनश्रेणी (Pay Scale) वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तोडीस तोड असावी.
5) “ओरल हेल्थ अवेअरनेस” (मुख आरोग्य जनजागृती) साठी विशेष अर्थसंकल्पीय तरतूद करावी.
6) प्रत्येक सार्वजनिक आरोग्य केंद्रात एक दंत शल्यचिकित्सक नेमावा.
7) केंद्र शासनाच्या आरोग्य विभागातील पदे नियमितपणे भरली जावीत.
8) वैद्यकीय इंटर्नशिप दरम्यान दंत विद्यार्थ्यांना स्टायपेंड (मानधन) देण्यात यावे.
या मागण्यांद्वारे दंतशास्त्र विद्यार्थ्यांनी शासनाने दंतचिकित्सकांच्या समस्या गांभीर्याने घेत न्याय्य तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. निवेदनावर वेंकटेश भिंगोळे आणि श्रेयस वाघुळे यांसह सर्व दंतशास्त्र विद्यार्थी व दंतचिकित्सकांच्या वतीने स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.






