Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home संपादकीय

डिग्री होल्डरांचे तूणतूणं

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 12, 2021
in संपादकीय
0
डिग्री होल्डरांचे तूणतूणं
0
SHARES
342
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

देशामध्ये आंबेडकरी विचार प्रवाह आहे. दैववाद स्वीकारत नाही, तर मानवतावाद स्वीकारतो. या कारणास्तव आंबेडकरी चळवळीचे प्रथम कर्तव्य हे मानवतावाद वाढविणे आहे. यासाठी स्वताच्या आचरणापासून सुरुवात होते. आंबेडकरवाद्याने स्वताच्या वागण्याच्या पद्धतीचे पुनर्वलोकन करणे गरजेचे आहे. आज समाजव्यवस्थेत बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची गरज नाही, तर जो दैववाद मानतोय तोही बाबासाहेबांना संविधानात शोधतोय आणि दुर्दैवाने तथाकथित आंबेडकरी बाबासाहेबांना मुर्त्यांमध्ये अडकवायला निघाले आहेत. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार, प्रसार आणि सैद्धांतिक पद्धतीने मांडणे ही काळाची गरज आहे. या दृष्टीने तथाकथित आंबेडकरवाद्यांनी अजून सुरुवात केली नाही आणि त्यामुळे त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पसरवता येत नाही.
मी आंबेडकरवादी तरुण पिढीचे दोन वर्गात वर्गीकरण करतो, एक जो डिग्री होल्डर आहे पण, बुद्धीमान आहे. दुसरा नुसताच डिग्री होल्डर आहे. दुर्दैवाने नुसताच डिग्री होल्डर जो आहे तो आश्रयीत आहे. आणि शिकलेला बुद्धिमान जो आहे. त्याने स्वताचे विश्व निर्माण केले आहे. आश्रयीत आंबेडकरवाद्याला जगण्यासाठी ‘जात’ ही महत्त्वाची आहे. आणि त्याशिवाय तो जगू शकत नाही. आणि म्हणून त्याचा बघण्याचा चष्मा हा ‘जात’ आहे. दुसरा आंबेडकरवादी याने आपले विश्व निर्माण केल्याने त्याला जातीचा आधार लागत नाही, तर स्वताच्या बुद्धीच्या जोरावरती व्यवस्थेशी लढतोय आणि स्वताचे म्हणणं ठासून सांगतोय. दुर्दैवाने नुसतेच डिग्री होल्डरांची संख्या अधिक असल्यामुळे तो सर्वच गोष्टीत वर्चस्व गाजवायला लागतो. त्याच्या हे लक्षात येत नाही की, समाज आणि व्यवस्था आंबेडकर आणि आंबेडकरवाद शोधत आहे. आपल्याला कळत नसेल तर आपण, थांबून कळणार्‍या  आंबेडकरवाद्याला पुढे येवू द्यावे.

आंबेडकरी समूहाने या स्वावलंबी डिग्री होल्डरला नेतृत्व करू दिले असते, तर परिस्थिती बदलली असती. हे सुद्धा तो करत नाही. यातून जी थेरी बाबासाहेबांनी मांडली. क्रांती आणि प्रतिक्रांती यामध्ये प्रतिक्रांतीचा विजय होतोय, हे त्याच्या लक्षात येत नाही. नुसता डिग्री होल्डर असल्यामुळे क्रांती आणि प्रतिक्रांतीची सुरुवात होते. त्यावेळेस मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखणे महत्त्वाचे आहे. नुसता डिग्री होल्डर असल्यामुळे कोणीही सेक्युलर, निधर्मवादी, समाज परिवर्तनवादी, शाहू, फुले, आंबेडकर हे शब्द भाषणात 100 वेळा वापरले की, त्याला पुरोगामी मानायचे. शब्दातून तो पुरोगामी आणि कृतीतून पुरोगामी आहे का? हे तपासायचे नाही. डिग्री हे विवेक देत नाही, तर अनुभव हा विवेक देतो. डिग्री होल्डर आरक्षणामुळे नोकरीला लागला पण, त्यानंतर त्याने निर्माण काय केले ? पतसंस्था चालु केल्या का? शाळा उघडली का? एखादी सामाजिक संघटना चालवली का? शिक्षण क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये स्पर्धा भरवल्या का? असे नाना उद्योग केले असते, तर हे चालवणे कसं असतं हे समजले असते. चालविण्यासाठी काय करावे लागते हे लक्षात आले असते. दहा सवंगडी जमवण्यासाठी, त्यांचा विश्वास संपादित करण्यासाठी काय करावे लागते किंवा एखादी संस्था उभी राहिली तर मग शासकीय आणि इतर पातळ्यांवरती टिकविण्यासाठी कशा पद्धतीने विरोध होतो तो विरोध मोडण्यासाठी किंवा कसा विरोध केला जातो? विरोध का  केला जातो? याचा अनुभव आला असता. हा अनुभव नसल्यामुळे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला या पद्धतीने डिग्री होल्डर वागतो. मला शंका आहे की, या डिग्री होल्डरने महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले बाबासाहेबांचे एक तरी खंड वाचले का ? किंवा खैरमोडे लिखित एकतरी खंड वाचले का ? ज्या डिग्री होल्डरला याची जाणीव नाही की, त्याला शिष्यवृत्तीसाठी त्याच्या कालावधीमध्ये मोर्चे काढावे लागत, निवेदन द्यावी लागत. ते तोे डिग्री घेतल्या-घेतल्या सहज विसरून जातो. डिग्री घेतली की, त्यातला माणूसपण संपतो आणि त्यातला भालवन, आंदवन, लाडवन, कोसरे, सोमस, बावन आणि उरलेल्या साडे बारा जाती उभ्या राहतात. इथेच खरा तथाकथित डिग्री होल्डर आंबेडकरवाद्याने बाबासाहेबांचा खून केला. हा डिग्री होल्डर एका बाजूला जात व्यवस्था संपली पाहिजे आणि दुसर्‍या बाजूला पोटजातीत व्यव्हारात्मक वागतो अशी परिस्थिती आहे. आज प्रतिक्रांती जिंकते याचे कारण, शिकलेला आंबेडकरवाद्यांमुळेच.

बाबासाहेबांना ज्या-ज्या वेळेस विद्वातेच्या स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न झाला. त्या-त्या वेळेस तथाकथित डिग्री होल्डर आंबेडकरवाद्याने विरोध केला आहे. उदा. इंदू मिल. अनेक जणांना बाबासाहेबांचे परदेशी धोरणावरती विपुल लिखाण आहे किंवा त्यांचे पं. जवाहरलाल नेहरूसोबतच्या भांडणातला एक मुद्दा हा ‘परदेशी धोरण’ होता याचीही जाणीव नाही.
इंदू मिलच्या जागेमध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बाबासाहेबांच्या विचारांचे केंद्र हे उभे राहिले पाहिजे असं प्रतिगामी सरकार भाजपचे धोरण होत. त्यांनीसुद्धा हे धोरण सहजासहजी मान्य केले नाही,  दक्षिण आफ्रिकेमधला वंश संघर्षला संपवण्याचे मार्ग सापडला. त्यावेळेस जगभरात दुसरा सामाजिक अजेंडा आपण घेतला पाहिजे अशी चर्चा झाली. त्यामध्ये ख्रिश्चन संघटनांनाबरोबर घेवून ‘जात’ हा भारतातला सामाजिक संघर्षाचा मुद्दा आहे. त्याचा समावेश ज्या थीममध्ये करण्यात येत होता तो म्हणजे (एश्रळाळपरींळेप ेष रश्रश्र षेीा ेष वळीलीळारपरींळेप) सर्व प्रकारच्या भेदभावाचे निर्मूलन करणेे. यामध्ये जातीचा समावेश करण्याचा प्रयत्न चालला होता. नेहमीप्रमाणे भारताने आमच्या देशात जातीयता नाही, जातीचा अत्याचार नाही असा पवित्रा घेतला. आणि म्हणून भारत सरकार आणि माझ्या टीमचे (माझ्यासोबत 600 एनजीओ, अंतरराष्ट्रीय संस्था सहकारी म्हणून होत्या.) उघड भांडण झाले. दक्षिण आफ्रिकेतील डरबनमध्ये 166 देशांपैकी 135 देश हे आमच्या बरोबर होते. आणि ‘जात’ हा विषय अंतर्भूत झाला पाहिजे या मताचे होते. शेवटी भारत सरकारमार्फत भारताचे नाक कापू नये यासाठी समझोता झाला. भारताने या विषयाला मान्यता दिली. याचा समावेश करण्यासाठी भारत सरकारने मान्यता दिली आणि आम्ही लावलेला चाफ हा शिथिल करण्यात आला. त्यावेळी मी लोकसभेचा सदस्य असल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मला विचारले की, हे कसं शक्य झाले?

त्यांना मी एकच उत्तर दिले. भारत सरकारकडे अधिकारी सांगायचे या पलीकडे माहितीचा सोर्स (माहिती पुरवणारे) नाही. त्यामुळे एकतर काय चाललय याची पूर्ण माहिती येत नाही. आणि दुसरं एकच सोर्स असल्यामुळे तुम्ही काय करणार आहात, हे सहज ओळखले जाते.  त्यामुळे तुमचा पराजय करणे फार सोपे होते. त्या चर्चेतूनच इंदू मिल या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था उभी करणे आणि ती बाबासाहेबांच्या नावाने ओळखली जाणे. हा निर्णय झाला. आंतरराष्ट्रीय संस्था बांधत असताना बाबासाहेबांचा विचार आणि पुतळा दोन्ही आले असते. तथाकथित आंबेडकरी डिग्री होल्डरांचे वाचन नसल्यामुळे आणि वाचनाची ताकद समजत नसल्यामुळे इतरांनी जे सांगितले तेच त्यांनी मान्य केले. बुद्धिजीवी वर्गामध्ये या निमित्ताने वेगळे बाबासाहेब उभे राहिले असते. त्याची अडचण इथल्या प्रतिगामी शक्तींना दिसत होती आणि म्हणून त्यांनी तथाकथित डिग्री होल्डर आंबेडकरवाद्यांना हाताशी धरून पुतळ्याचे राजकारण गेले. अनेक वर्ष आपण पाहतोय तथाकथित शिकलेल्या आंबेडकरवाद्याला पुतळा संरक्षण देईल की, विचारप्रवाह संरक्षण देईल हेही समजण्याची तसबी नाही. गावातून शहराकडे स्थलांतरीत झालेला माणूस डिग्री होल्डर नव्हता पण, अनुभवाने तो शिकलेला होता. आपल्याला सरकारी जागेमध्येच अतिक्रमण करावे लागेल तेव्हा त्याने स्वतासाठी अतिक्रमण केले नाही, तर पहिल्यांदा बाबासाहेबांसाठी केले. एक पुतळा उभारला आणि त्यानंतर वस्ती उभी केली. त्याचा हेतू स्पष्ट आणि मर्यादित होता. आपण अतिक्रमणातून उभारलेलं घर हे बाबासाहेब वाचवतील. ज्या दिवशी ते अतिक्रमण मान्यता प्राप्त झाले त्या दिवशी अत्यंत आनंदाने त्याने तो पुतळा काढला आणि ज्याला कुणाला तो बसवायचा होता त्याला त्याने दान म्हणून दिला. त्याचा हेतू स्पष्ट होता. आपली वस्ती अधिकृत झाली त्यावेळेस त्याने पुतळा काढला. भावना आणि व्यवहार याचा संगम त्या अनुभवातून शिकलेल्या समूहाला होता. पण, दुर्दैव आहे हे आहे की, डिग्री घेणार्‍या तथाकथित आंबेडकरवाद्यांना ती जाणीव नाही.

काँग्रेसने एक म्हटलं तर तो त्यांच्या बाजूने, राष्ट्रवादीने काही म्हटलं तर तो त्याच्या बाजूला. मानवतावादी संघटनेने काही म्हटलं तर तिकडे… पण, स्वताला काय म्हणायचे आहे? याबद्दल तो शून्य आहेे. त्याला असं वाटत ती पिढी अशिक्षित आणि मी शिक्षित. मार इथेच खाल्ला. तो अशिक्षित असला. पडेल ते काम करत होता. मानाने, सन्मानाने आणि कोणाच्यासमोर लाचारी व्यक्त न करता जगत होता. सन्मानाने जगत होता. तथाकथित आंबेडकरवादी शिकलेली पिढी दारूच्या, नशेच्या अधीन झाली. स्वताचा स्वाभिमान गहाण ठेवला. त्याच्या हेही लक्षात आले नाही की, 35 वर्षापर्यंत लोकसेवा आयोगाने त्याला परीक्षा देण्यामध्ये गुंतवले आणि अनेक जणांचे आयुष्य बरबाद करून टाकले. पसत्तीशी मधला आणि पंचवीशीतील यातला निवड करताना वयोवृद्ध निवडला जाईल कीतारुण्यातला निवडला जाईल ? हे ज्याला कळू शकत नाही तो चळवळीचा आणि राजकारणाचा भाष्यकार होतो. ज्याला याची जाणीव नाही की, माझ नोकरीला लागण्याचे वय कधी संपल? हे ज्याला कळू शकल नाही. तो एवढ्या मोठ्या चळवळीचा भाष्याकार कसा होवू शकता ? माझा सांगण्याचा मुद्दा प्रत्येकाला समजण्याच्या आणि समजवण्याच्या मर्यादा आहेत. ही ओळख ज्या दिवशी  होईल त्या दिवशी या चळवळीचे भवितव्य उज्ज्वल आहे.

तथाकथित शिकलेले आंबेडकरवादी खाऊन पिऊन सुखी जरी असले, तरी निवडणुकीच्या दिवशी आपल्याला विकत घ्यायला कोण येतेय ? याची वाट पाहत असतात आणि दुसर्‍या बाजूला आम्हाला सत्तेमध्ये स्थान नाही. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. इशससशीी रीश पर्शींशी लहेेीशीी  याचा अर्थ भिकारी हा कधीही मला हे पाहिजे हे सांगू शकत नाही. हाच सगळा तथाकथित आंबेडकरवादी इतर पक्षांनी आम्हाला बौद्धांवरती लक्ष केंद्रित करावे लागेल अस म्हटल्यावर नाचायला लागला, उड्या मारायला लागल. जसे की, आपले अस्तित्व आजच सापडले. पण, हा विचार करायला तयार नाही की, ज्यांनी हे म्हटलं की, आम्हाला बौद्धांकडे नजर ठेवावी लागेल, तर नजर का ठेवावी लागेल ? अस काय केलेय? तर फुले, शाहू, आंबेडकर या नावाने वंचित समुहाची जी चळवळ उभी राहिली तिने एकत्रित आपली ताकद दाखवली आणि वंचितांची सत्ता अशीच वाटचाल करत राहिली, तर वंचित सत्ताधारी झाल्याशिवाय राहणार नाही. या भीतीपोटी आपल्याला विचारले जातंय. आपले हात शेकले नसल्यामुळे कळत नाहीये. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था काढल्या असत्या, तर अनुभवातून तावून सलाखून योग्य निर्णय घेण्याची क्षमता आली असती परंतु, बसल्या बसल्या महिन्या दर महिन्याला सरकारी पगार, कष्ट काहीच नाही. फक्त सकाळी दहाला ऑफिस संध्याकाळी सहाला परत. यामुळे चळवळीला मातीत घालायला निघाले आहेत. मी जोपर्यंत ‘गांडीवरती फटके’ हा लेख लिहला नाही. तोपर्यंत एकही तथाकथित डिग्री होल्डर आणि समिक्षक हा जसा मुसलमानांना टार्गेट करतो तसा हिंदुमधल्या इतर वर्ग आणि ह्या इतर वर्गाचा नायक म्हणजे, धर्मांतरीत बौद्ध हा टार्गेट आहे, हे लक्षात आले नाही. एवढी आमची मोठी विद्वत्ता !  दुर्दैव हे की, ज्याला समजल तोही मौनी बाबा झाला आणि ज्याच्या ‘गांडीवर फटके’ बसले तोही मौनी बाबा झाला. याचा अर्थ धर्मांतरीत बौद्ध कुठल्याही पातळीवर लिडरशिप द्यायला कमकुवत आहेत. जुन्या पिढीसारखी गांडीत धमक नाही. फक्त तोंडाची वाफ की, आम्ही बौद्धमय करू पण, आम्ही बौद्ध होणार नाही हीच तर शोकांतिका आहे. त्यातल एक बरं आहे की, आंबेडकरी आवाका हा वाढत असल्यामुळे यांची सगळी सोंग झाकली जातात. आंबेडकरी चळवळीतले खरे मारेकरी भाजपा आहे याबद्दल दुमत नाही पण, छुपे मारेकरी हे तथाकथित आंबेडकरी डिग्री होल्डर आहेत. बाबासाहेबांनी डिकास्ट व्हायला सांगितले. मानवतेकडे चला सांगितले आणि मानवतेकडे जायचे असेल, तर समदुखी समूह म्हणजे उद्याच्या एनसीआर, सीएए, एनपीआरमधून बाधित होणार्‍या समूहाकडे मैत्रीचा हात, एकमेकांना विश्वास देण्याला सुरुवात झाली असते. स्वतः बाबासाहेब आणि  बुद्ध मानायचा नाही, पाळायचा नाही पण, इतरांना त्याबद्दल शहाणपण शिकवत बसायचे आणि त्यातून दुरावा कायम ठेवण्याचा प्रयत्न करायचा.

येणारे संकट हे मोठे आहे. इथे सरळ-सरळ हिंदू समाजात दोन वर्ग निर्माण झालेत. एक म्हणजे एनसीआर, सीएए, एनपीआर यामध्ये न बाधित होणारा वर्ग आणि बाधित होणारा वर्ग. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व हे सवर्णांचे नेतृत्व आहे, राष्ट्रवादीचे नेतृत्व मराठ्यांचे आहे. या दोन्ही समूहांवर एनसीआर, सीएए, एनपीआर या कायद्याचा परिणाम होणार आहे का? माझ्यादृष्टीने, अभ्यासप्रमाणे नाही. जर त्यांच्यावर परिणाम होणार नसेल, तर ते लढणार कशासाठी ? त्यांना ज्या वेळेस लढण्याची गरजच नाही, तर ते लढणार नाहीत. हे दोन्ही राजकीय पक्ष इतरांच्या मंचावर जावून आमचा पाठींबा आहे हे व्यक्त करतात पण, स्वताच्या पक्षाच्या नावाखाली, झेंड्याखाली आणि स्वताच्या केडरला घेवून ते एनसीआर, सीएए, एनपीआर कायद्याला विरोध करत नाहीत. हे जर तथाकथित डिग्री होल्डरला समजत नसेल तर “बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना” म्हणी प्रमाणेे तो वागत आहे. यांच्यापासून जेवढं सावधान राहता येईल ते अधिक चांगल. नेतृत्व करणारा गरीब की श्रीमंत हा मुद्दा नाही. तर नेतृत्व करणारा कुठल्याही पद्धतीने अवलंबित नाही, हे महत्त्वाचे आहे. गेले 30 वर्षाचे नेतृत्व हे अवलंबित नेतृत्व आहे, या अवलंबित नेतृत्वाने घात घातला. त्याच्या नावानं ेदगड फोडायची आणि पुन्हा हा तथाकथित डिग्री होल्डर आंबेडकरवादी ‘ये रे माझ्या मागल्याप्रमाणे’ काहीच शिकायचे नाही, स्वावलंबी होण्यापेक्षा अवलंबित्वाच्या राजकारणाचा पुरस्कर्ता होतो. यांच्यापासून सावधान…!

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर


       
Tags: prakshambedkarआंबेडकरवादीडिग्री होल्डरदैववादबुद्धीमानविचारांचा प्रचार
Previous Post

एल्गार भीमा कोरेगाव हिंसाचार

Next Post

मोदी – शहा जोडीचे देशविरोधी धर्मांध राजकारण

Next Post
मोदी – शहा जोडीचे देशविरोधी धर्मांध राजकारण

मोदी - शहा जोडीचे देशविरोधी धर्मांध राजकारण

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !
सामाजिक

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !

- आकाश मनीषा संतराम स्थळ परभणी. 10 डिसेंबर 2024. मंगळवारचा दिवस होता. पूर्वेला सूर्याची लाली आली होती. कुणी कामावर जाण्याच्या ...

February 15, 2025
सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !
विशेष

सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !

कालकथित सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी वेळोवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले आहेत. ते ज्यावेळी कुर्ला येथे ...

February 15, 2025
शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!
विशेष

शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!

- आकाश मनिषा संतराम संपूर्ण जगभरात आजचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. विशेषतः तरुण ...

February 14, 2025
तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म
सामाजिक

तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म

प्रा. डॉ. गणेश बोरकर संत रोहीदास हिंदू नव्हते त्यांनी विज्ञानवादी रोहीदासीया समाजाची रचना केली आहे. ६२३ वर्षापूर्वी संत रोहीदासांनी मांडलेली ...

February 14, 2025
धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?
बातमी

धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?

सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा सवाल ! परभणी : सोमनाथच्या मारेकर्‍यांना माफ करा, असे आ.सुरेश धस साहेब तुम्ही कसे काय म्हणू शकता? ...

February 11, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क