Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

मोदी – शहा जोडीचे देशविरोधी धर्मांध राजकारण

Jitratn Usha Mukund Patait by Jitratn Usha Mukund Patait
October 20, 2022
in Uncategorized
0
मोदी – शहा जोडीचे देशविरोधी धर्मांध राजकारण
0
SHARES
66
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

साक्या नितीन

१५ तारखेला #NRC #CAA(Citizenship Amendment Act विरोधात आसाम तसेच दिल्लीमधे उसळलेल्या आंदोलनाविषयी बोलताना मोदी म्हणाले “आंदोलकांच्या कपड्यांवरून कोण हिंसा करत आहे हे तुम्हाला ओळखता येईल.” या देशात पेहरावावरून शीख आणि मुस्लिम समुदाय सहज ओळखता येतात. मोदींचा इशारा जामिया मिलियाच्या आंदोलनकारी विद्यार्थी, विद्यार्थिनींकडे होता. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे. पंतप्रधानपदाची घटनात्मक जबाबदारी स्वीकारत असताना देशाच्या नागरिकांमध्ये भेदभाव न करण्याची शपथ घेतली जाते. पण मोदींनी मुस्लिम समाजाविरोधात गरळ ओकून अनेकदा ही शपथ मोडली आहे.
मोदीशाच्या कारभाराचा महत्वाचा आधार म्हणजे मुस्लिमद्वेष. या सरकारने आजवर घेतलेले निर्णय पहा. ज्या निर्णयामुळे मुस्लिम समाज भरडला जाणार आहे, दुखावला जाणार आहे ते निर्णय घेण्यास हे सरकार मागेपुढे पहात नाही. ट्रिपल तलाक, ३७०, NRC, CAB या सर्व निर्णयांचा फटका हा मुस्लिम समाजालााच जास्त बसणार आहे हे उघड आहे. हे सरकार एका पाठोपाठ एक मुस्लिम विरोधी निर्णय का घेत आहे हा महत्वाचा प्रश्न आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांचे हीत सांभाळणारे निर्णय घेण्यास हे सरकार एकीकडे दुर्लक्ष करत आहे पण मुस्लिम समाजाला ज्याचा फटका बसेल असे निर्णय मात्र बेधडक घेतले जात आहेत. मुस्लिम विरोधी निर्णय घेतल्यावर सुखावणारा एक मोठा नवशिक्षीत नवश्रीमंत, नवमध्यम, नवं हिंदू वर्ग या देशात मोठ्या प्रमाणात आहे. कुटुंबाकडून वारसा हक्कात मिळालेला मुस्लिम, दलित द्वेष, आरएसएस शाखा व संलग्न धर्मांध संगठना आणि व्हाट्सअप युनिव्हर्सिटीतुन मिळालेले ईतिहास, वर्तमानातील घटनांची तोडामोड करून तयार केलेले मुस्लिम विरोधी धडे यावर हा वर्ग पोसला गेला आहे. मुस्लिम भरडला जातो म्हणून हा वर्ग मोदींच्या मागे उभा आहे. स्वतःच नुकसान झालं तरी चालेल पण मुस्लिम समाजाला धडा शिकवलाच पाहिजे या विचाराने पछाडलेले हे लोक आहेत. कधीकाळी पाकिस्तानी हुकूमशहा जनरल झिया म्हणाला होता “घास खाऐंगे लेकीने एटम बम बनाएंगे!” आता मोदी भक्त म्हणतात “पेट्रोल ५०० रुपये झालं तरी चालेल पण मोदीच पाहिजे.” पण भक्त असं का म्हणत आहेत यावर विचार झाला पाहिजे. भक्तांना मोदी फक्त मुसलमानांना धडा शिकवायला पाहिजे आहे. देशाचा विकास करावा अशी या भक्तांची अजिबात अपेक्षा नाही. मुळात देशाच्या प्रगतीशी भक्तांना काहीही देणंघेणं नाही कारण मुस्लिम, दलित, आदिवासींचा, आंबेडकरवादी, डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा द्वेष करून भक्तांच पोट भरत असतं. धर्मांधांच्या दृष्टीने गुजरात दंगल हे मोदींच सर्वात मोठं कर्तृत्व आहे. गुजरात दंगलीत मोदीने बाबू बजरंगी सारख्या गुंडांना मुसलमानांचे खून करण्यास मोकळीक दिली होती. सरकारी यंत्रणांच्या संगनमताने भाजप-आरएसएस, व्हिएचपीच्या गुंडांनी मुसलमानांचे खून केले. अश्याच दंगली घडवुन मुसलमानांना धडा शिकवण्यास उत्सुक असलेल्या नवं श्रीमंत, नव मध्यमवर्गीय धर्मांधांना मोदी हवेहवेसे वाटतात. या धर्मांधांच्या मागे मग ज्याचे जीवन मरणाचे प्रश्न सुटलेले नाहीत, ज्याला रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो असा गरीब हिंदू वर्ग सुद्धा वाहवत जातो. सरकारला जाब विचारण्याऐवजी आपल्या अधोगतीला तो इस्लामिक आक्रमकांना जबाबदार मानतो. आपल्या सद्य परिस्थितीला वर्तमान सरकारची ध्येयधोरणे जबाबदार आहेत हा विचार करण्याची उसंत सुद्धा त्याला भाजप-आरएसएसच्या गोबेल्सच्या बापालाही लाजवेल अश्या अपप्रचार यंत्रणेमुळे मिळत नाही. प्रिंट, इलेक्टरोनिक, सोशल मीडियाला कवेत घेणारी भाजप-आरएसएसची अपप्रचार यंत्रणा हा वेगळ्या लेखाचा विषय आहे.

देशाच्या उध्वस्त होत असलेल्या अर्थव्यवस्थेवरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी मोदींनी मुद्दाम #CAA आणले असा आरोप एड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. या आरोपात तथ्य आहे. देशाचा जीडीपी अधिकृतपणे ४.५ सांगितला जात आहे पण हा आकडा जीडीपी गनन प्रक्रियेत बदल करून मिळवला गरला आहे असा अर्थतज्ञांचा आरोप आहे. देशाचा जीडीपी प्रत्यक्षात १.५ ते २.५ ईतका असावा असे तज्ञांचे म्हणणे आहे. मालवाहू गाड्यांची विक्री नीचांकी पातळीवर आहे. उद्योग क्षेत्राकडून विजेची मागणी कमी झाली आहे. सिमेंट मागणी कमी झाली आगे. आपल्या मुच्युएल फंडांचे मागील दोन वर्षातील रिटर्न तपासा, बाजारात सोनारांना मागची दिवाळी कशी गेली ते विचारून पहा. दुपारी १२ – १ च्या सुमारास नाका कामगारांच्या ठिकाणांना भेटी द्या  आणि अर्थव्यवस्थेच सत्य जाणून घ्या. मालवाहू गाड्यांची खरेदी, विजेची मागणी, सिमेंटची मागणी, सोन्याची विक्री, नाका कामगारांची मागणी हे देशाच्या विकासाची कथा सांगत असतात. बेरोजगारीने मागील ४५ वर्षाचा उच्चांक गाठला आहे. जीडीपी कमी झाला की बेरोजगारी वाढते हे साधसरळ समीकरण आहे. हे बेरोजगार रिकामे हात आपल्याला जाब विचारण्यासाठी आपल्या दिशेने वळू नयेत म्हणून देशात #CAA च्या निमित्ताने विद्वेषाच वातावरण निर्माण केलं जातं आहे. जनतेच लक्ष सरकारच्या आर्थिक अपयशाकडून धार्मिक उन्माद निर्माण केला जात आहे. आर्थिक आघाडीवर सरकारच्या अपयशाची चर्चा होण्याऐवजी धर्मावरून नागरिकतेच्या मुद्दयावर चर्चा घडवली जात आहे. या विद्वेषाच्या वातावरणावर मुस्लिमविरोधी झुंड आरूढ झाली आहे. 

ही मुस्लिमविरोधी झुंड मुळात नारसिस्ट आहे. मुसलमानांच्यानंतर यांना आंबेडकरवाद्यांना, डाव्यांना.  झुंडशाहीला, धर्मांधतेला विरोध करणाऱ्या सर्वांना ही झुंड धडा शिकवण्याची भाषा करते. या झुंडीच्या तोंडी शिवाजी महाराजांचे, भगत सिंहाचे नाव असले तरी तावडीत सापडलेल्या शत्रूपक्षाच्या स्त्रियांना सन्मानाने परत पाठवणाऱ्या शिवाजी महाराजांऐवजी शत्रूपक्षाच्या स्त्रियांवर बलात्कार न करता त्यांना सन्मानाने परत पाठवणे ही सद्गुणविकृती आहे असे प्रतिपादन करणारा सावरकर रोल मॉडेल वाटतो. समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची भाषा करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर शत्रू वाटतात तर गांधी, नेहरू हिंदू विरोधी वाटतात. भाजप-आरएसएस त्यांच्या हजारो संगठनांच्या देशभर पसरलेल्या जाळ्याच्या माध्यमातून समाजात विषाची पेरणी करत असताना अनेक समाजवाद्यांनी त्यांना बळ दिले, काँग्रेस मधील संघी नेत्यांनी त्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले तर आंबेडकरवादी आणि डावे प्रक्षोभ व्यक्त करण्या पलीकडे फार काही करु शकले नाहीत. काँग्रेसने तर डाव्यांना कमजोर करण्यासाठी सावरकरवादी शिवसेनला मुंबईत बळ दिले. बंगाल, केरळ मध्ये भाजपला छुपी मदत केली. नरसिम्हां राव काँग्रेस सरकार मधे असताना त्यांनी संघाचे गुणगान गात संघावरील बंदी उठवली. तेच नरसीम्हाराव देशाचे पंतप्रधान असताना बाबरी मस्जिद पाडली गेली हा निव्वळ योगायोग नक्कीच नव्हता. या नरसीम्हारावांचा व्हिएचपीने आमचे पाहिले पंतप्रधान असा गौरव केला होता. सावरकरांचे गुणगान गाणारा शरद पवारांचा एक जुना व्हिडियो सोशल मीडियात व्हायरल झाला होता. एनसीपी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि संभाजी भिडे यांचे सख्य उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. सावरकर हा एनसीपी आणि शिवसेनेला जोडणारा दुवा आहे. राहुल गांधी संसदेत माफी मागायला मी काही सावरकर नाही असे म्हणत असताना महाराष्ट्रात तीच काँग्रेस सेना-एनसीपी सोबत सत्तेत बसलेली आहे. धर्मांधता ही केवळ मुस्लिम, दलित, आदिवासी, आंबेडकरवादी आणि डाव्यांसाठीच घातक नसून ती बहुसंख्य हिंदूंसाठी सुद्धा घातक आहे. वेळीच डोळे उघडले नाहीत तर बहुसंख्य हिंदू हा एक दिवस या धर्मांधतेचा बळी ठरणार आहे. धर्मांधता हि आधुनिकतेच्या, विज्ञानाच्या आणि ज्ञानाच्या विरोधात आहे. गुरुमुर्थी सारखा प्लास्टिक सर्जरी आणि पुष्पक विमान वगैरेंवर अगाध श्रद्धा, विश्वास असणारा माणूस आरबीआयच्या संचालक मंडळावर नेमल्याबर आरबीआयची स्वायत्त घोक्यात येणे हा योगायोग नाही. सरकारला सर्वाधिक नफा मिळवून देणारी ओएनजीसी संबीत पात्रा संचालक झाल्यावर तोट्यात जाणे योगायोग नाही. बाबरी मशिदीखाली सापडलेले गैर इस्लामिक म्हणजे बौद्ध स्तूपाचे किंवा जैनांच्या मंदिराचे अवशेष आहेत असा स्पष्ट निर्वाळा ICHR देत नाही हा योगायोग नाही. राखीगढी मधे सापडलेले डीएनए पुरावे हरप्पाला वैदिक असण्याच्या दाव्याला फोल ठरवत असताना वसंत शिंदे ढळढळीत पुरावे समोर असताना वसंत शिंदे उलट दावा करून जगात भारताचे हसे करून घेतात हा योगायोग नाही. कांद्याचे भाव वाढल्यावर मी आमी माझा परिवार कांदा खात नाही त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही असे निर्मला सिथारमन म्हणते हा योगायोग नाही. रघुनाथ माशेलकर सारख्या CSIR च्या माजी संचालकाला गोमूत्रावर संशोधन करण्यास लावणे हा योगायोग नाही. ही सगळी सरकारच्या धर्मांधतेची उदाहरणं आहेत.

देश हा केवळ भूभागाचा बनलेला नसतो तर त्या भूभागावर राहणाऱ्या लोकांचा बनलेला असतो. देश हा विशिष्ट भूभागात राहणाऱ्या लोकांमधे असलेल्या परस्पर बंधुत्वाच्या भावनेचा अविष्कार असतो. स्टेट आणि लोकशाही त्यानंतर येतात. पेशवे काळात मराठा साम्राज्याच्या प्रभावाखालील प्रदेशाच्या सीमा दिल्ली ते तंजावर आणि पंजाब ते बंगाल पर्यंत विस्तारल्या गेल्या होत्या. अहमद शाह अब्दाली जेव्हा दिल्लीवर चाल करून आला तेव्हा त्याच्या विरोधात लढायला केवळ मराठेच गेले. शीख, जाट यांनी मराठा फौजेला मदत केली नाही. कारण पेशव्यांच्या अधिपत्त्याखाली विस्तीर्ण भूभाग असला तरी या भूभागावर राहणाऱ्या मराठा, शीख, जाट लोकांमधे देशभावनेचा आणि बंधुत्वाचा अभाव होता. खुद्द पेशवा फौज जातीपातीत विभागली गेली होती. पेशवा, मराठा फौजांना वारंवार द्याव्या लागणाऱ्या चौथ मुळे उत्तरेतील शीख, जाट राजे पुरते वैतागले होते. चौथ म्हणजे प्रोटेक्शन मनी. बंगाल मधे तर मराठा फौजा बारगीर म्हणून पुरत्या बदनाम झाल्या होत्या. बंगाल मधे राघूजी भोसलेच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनी जो प्रचंड हाहाकार उडवला होता त्याचे थरकाप उडवणारे वर्णन महाराष्ट्र पुराण या बंगाली भाषेत लिहिल्या गेलेल्या तत्कालीन पुस्तकात ऊपलब्ध आहे. ब्रिटिशांनी सुद्धा त्याच्या नोंदी करून ठेवल्या आहेत. पंजाब सहित संपूर्ण उत्तर भारतातील बहुसंख्य जनतेसाठी पेशवे, मराठे आणि अब्दाली हे दोघेही सारखेच परकीय होते. शीख आणि जाटांना पेशवा, मराठा फौजेविषयी देशबांधव किंवा धर्मबांधव म्हणून ममत्व नव्हते. बंगाल मध्ये हाहाकार उडवणाऱ्या राघूजी भोसलेच्या फौजांना बंगाली मुस्लिम तर दूर बंगाली हिंदूंविषयी सुद्धा तिळमात्र प्रेम नव्हते. उत्तर भारतातील, बंगाल मधील बहुसंख्य हिंदू जनतेच्या दृष्टीने पेशवा, मराठा फौजा अब्दाली सारख्याच परकीय ठरल्या ही बाब हिंदुराष्ट्रवादाच पितळ उघड पाडते.

आज बहुसंख्य मराठी, बंगाली, तामिळ जनतेला मोदिशा जोडी एखाद्या परकीय आक्रमकांपेक्षा फार वेगळी वाटत नाही. महाराष्ट्रात जेव्हा काँग्रेस, एनसीपी, शिवसेना एकत्र आले तेव्हा अनेकांनी त्याकडे मोदीशाच्या आक्रमणासमोर महाराष्ट्र एकत्र आला या दृष्टीने पाहिले. कोणतीही कट्टरता मग ती धार्मिक असो वा भाषिक, प्रांतीय, जातीय किंवा वांशिक असो ती मानवताविरोधी, लोकशाही विरोधी आहे आणि अंतिमतः विनाशकारी आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला नरेंद्र मोदींची गरज नाही त्यासाठी नाझीवादातून हिटलरने घडवलेला ज्यूंचा नरसंहार आणि शेवटी झालेल्या जर्मनी, जपानच्या विनाशाच उदाहरण पुरेस आहे. मोदीशहांची धर्मांधता आज जरी देशातल्या एका मोठ्या वर्गाला हवीहवीशी वाटत असली तरी ती कट्टरता अराजकाकडे, लोकशाहीच्या पतनाकडे आणि अंतिमतः विनाशाकडे घेऊन जाणारी आहे हे लक्षात घेऊन या कट्टरतेच्या आड या सरकारने घेतलेल्या भांडवलदार धार्जिण्या तसेच केवळ मुस्लिम नाही तर दलित, आदिवासी, शेतकरी, विद्यार्थी विरोधी आणि पर्यायाने बहुसंख्य हिंदूविरोधी निर्णयांचा प्रखर विरोध केला गेला पाहिजे. नाहीतर अखंड हिंदू राष्ट्र निर्माण करायला निघालेल्या या गॅंगकडून देशाचे बाल्कनायजेशन होण्यास फार वेळ लागणार नाही.


       
Tags: CAANPRNRCमोदीशहा
Previous Post

डिग्री होल्डरांचे तूणतूणं

Next Post

भारतीय नागरिकत्व विरुद्ध आरएसएसचे नागरिकत्व

Next Post
भारतीय नागरिकत्व विरुद्ध आरएसएसचे नागरिकत्व

भारतीय नागरिकत्व विरुद्ध आरएसएसचे नागरिकत्व

वंचित युवा आघाडीने महामार्गावरील अपघात स्थळांचे केले आमदार हरीष पिंपळे ऍक्सीडेंट स्पॉट नामकरण
बातमी

वंचित युवा आघाडीने महामार्गावरील अपघात स्थळांचे केले आमदार हरीष पिंपळे ऍक्सीडेंट स्पॉट नामकरण

बार्शिटाकळी - मंगरूळपिर राज्य महामार्गावरील विद्रुपा नदीवर कान्हेरी सरप जवळील आणि शिवम जिनींग फॅक्ट्री जवळील पुलावर मागच्या वर्षीपासून कठडे नाहीत, ...

March 16, 2023
भाजपच्या भ्रष्टाचाराने मरण पावलेल्या गौरक्षण अर्धवट रस्त्याच्या अकाली निधनावर घेतली शोकसभा.
बातमी

भाजपच्या भ्रष्टाचाराने मरण पावलेल्या गौरक्षण अर्धवट रस्त्याच्या अकाली निधनावर घेतली शोकसभा.

३१ मार्च पर्यंत अर्धवट रस्ता पूर्ण न झाल्यास युवा आघाडी रस्त्याचे श्राद्ध घालणार अकोला : भाजपचे खासदार, आमदार आणि महापौर ...

March 16, 2023
चातुर्वर्णातील वैदिक आणि तांत्रिक राज्याभिषेक
सामाजिक

चातुर्वर्णातील वैदिक आणि तांत्रिक राज्याभिषेक

पुणे  जिल्ह्यातील जुन्नर  शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराष्ट्र राज्य शासनाने ...

March 13, 2023
जैन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान; वंचित बहुजन युवा आघाडीची पोलिसात तक्रार दाखल
बातमी

जैन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान; वंचित बहुजन युवा आघाडीची पोलिसात तक्रार दाखल

बंगलोर - जैन विद्यापीठ बँगलोर येथे विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात दलित समाजा बद्दल आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, परमपूज्य महामानव डॉ. ...

February 10, 2023
वंचीत बहुजन आघाडी – शिवसेना युतीचे कार्यकर्त्यांकडून स्वागत
बातमी

वंचीत बहुजन आघाडी – शिवसेना युतीचे कार्यकर्त्यांकडून स्वागत

पुणे : वंचित बहुजन आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या युतीची घोषणा होताच पुण्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन ...

January 23, 2023
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क