पुणे : पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींचा पोलिसांकडून छळ झाल्याच्या आरोपाने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
औरंगाबाद येथे एका प्रकरणाच्या चौकशीसाठी या मुलींना कोथरुड पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. पीएसआय प्रेमा पाटील आणि पीएसआय कामटे या दोन अधिकाऱ्यांनी हा छळ केल्याचा दावा पीडित मुलींनी केला आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रोहित पवार, सुजात आंबेडकर, प्रशांत जगताप आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाबाहेर ठिय्या दिला. रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.
या प्रकारानंतर सुजात आंबेडकर यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, पोलीस मुलींचा छळ करतात, त्यांचा विनयभंग करतात. त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावर अॅट्रोसिटी करतात. पण, आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी पोलीस यंत्रणा अॅट्रोसिटीची साधी तक्रारही घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
काल रात्री उशिरापर्यंत पुणे पोलीस आयुक्तालयात रोहित पवार, सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर, प्रशांत जगताप यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते. या सगळ्यांनी सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा साहेब आणि अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील साहेब यांच्याशी चर्चा देखील केली.
मात्र, पोलिसांनी मुलींच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन घेण्यास नकार दिला. या प्रकरणाने पुणे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
वाशीम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – वंचित बहुजन आघाडीची मदतची मागणी
वाशीम : गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रिसोड, वाशीम, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा...
Read moreDetails