नवी दिल्ली : आज भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीताराम देशाचं बजेट (Budget) मांडतील. हे त्यांचं चौथं बजेट असणार आहे.
५ राज्यांच्या निवडणुका तोंडावर असताना हे बजेट सादर केले जाणार आहे. त्यामुळे या बजेट मधून मतदारांना आकर्षित करण्यासाठी काय तरतुदी केल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अर्थव्यवस्था ही मंदावलेली असल्याने त्यात तेजी आणण्यासाठी काय पावलं उचलली जातात याकडेही जाणकारांचे लक्ष असणार आहे.
सकाळी ११ वाजेपासून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणाला सुरुवात होईल. बजेटचे हे पहिले सत्र ११ फेब्रुवारी पर्यंत चालेल. दुसरे सत्र १४ मार्च ते ८ एप्रिल असे चालेल.