Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘राज ठाकरेंवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करा आणि पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांना निलंबित करा’

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 2, 2022
in बातमी
0
‘राज ठाकरेंवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करा आणि पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांना निलंबित करा’
0
SHARES
358
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

वंचित बहुजन आघाडी चे प्रवक्ते फारूक अहमद यांची मागणी

औरंगाबाद (प्रतिनिधी) औरंगाबादेत चिथावणीखोर भाषण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच 1 मे रोजी शांतता मार्च काढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला पोलीस परवानगी नाकारते परंतु प्रक्षोभक भाषण करून दंगली घडवण्यास प्रोत्साहन देणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देते, पोलीस आयुक्त निखील गुप्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागत आहेत. त्यामुळे त्यांची विभागीय चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी त्यांना निलंबित करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत केली.

https://www.facebook.com/VBAforIndia/videos/3183476175273729/?app=fbl

यासंदर्भात अधिक माहिती देताना फारूक अहमद म्हणाले देशात व राज्यांमध्ये  जातीय दंगली घडवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे उत्तर प्रदेश मध्ये पोलिसांच्या मदतीने दंगली पेटविण्यात आल्या महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालणारे राज्य आहे त्यामुळे राज्यात दंगली होणार नाही याची खात्री होती. सत्ताधारी  आणि विरोधी पक्ष राजकीय स्वार्थासाठी राज्यामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करून राज्याला दंगलीच्या खाईत लोटत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे प्रक्षोभक भाषण करून चिथावणी देत आहे. राज्यात दंगली घडू नये या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड प्रकाश आंबेडकर यांनी 1 मे रोजी राज्यामध्ये शांतता मार्च काढण्याचे पक्षाला आदेश दिले  होते. त्यानुसार औरंगाबाद जिल्हा कमिटीने क्रांती चौक ते भडकल गेट असा सायंकाळी शांतता मार्चचे आयोजन केले होते त्यासाठी पोलिसांना परवानगीही मागितली होती. परंतु पोलिसांनी  शांतता मार्चचा मार्ग बदलावा त्यानंतरच परवानगी मिळेल असे सांगितले मार्ग बदलण्याची तयारीही आमच्या नेत्यांनी दर्शवली होती मात्र  त्यानंतर  शांतता मार्चची वेळ सकाळी ७ ते ९ ठेवावी असे पोलिसांनी सुचविले. परंतु इतक्या सकाळी कोणीही रस्त्यावर नसते त्यामुळे सकाळची वेळ योग्य नव्हती असे सांगून फारूक अहमद म्हणाले की पोलिसांनी ऐनवेळी शांतता मार्च परवानगी नाकारली त्यांना आमच्या शांतता मार्च यशस्वी होऊ द्यायचा नव्हता. राज ठाकरेंच्या सभेच्या दिवशी पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना डांबून ठेवले कार्यकर्त्यांनी सभा उधळण्याची धमकी दिली नव्हती मग हा अन्याय कशासाठी? पोलिसांच्या वतीने पत्रकारांना पत्रकार परिषद रद्द झाली असे परस्पर सांगितले गेले वंचितच्या कार्यकर्त्यांची धरपकड कशासाठी कार्यकर्ते गुंड आहेत का? असा सवाल करीत फारूक अहमद म्हणाले हिजाब गर्ल बेबी मुस्कानच्या सत्काराला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर राज ठाकरेंच्या सभेला परवानगी कशी दिली? पोलीस आयुक्त निखील गुप्ता राजकीय दबावाखाली काम करीत आहेत. वंचितला गृहमंत्र्यांकडून सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे. या सर्व प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय चौकशी करून त्यांना निलंबित करावे आठ दिवसात त्यांना निलंबित केले नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला राज ठाकरें यांच्या सभेसाठी पोलिसांनी दिलेल्या अटी संदर्भात बोलताना फारूक अहमद म्हणाले सोळा अटीवर राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली होती. हा विषय उच्च न्यायालयातही पोहोचला आहे. राज ठाकरे यांनी सभेचे या अटीचे उल्लंघन केले आहे पोलिसांनी  त्यांच्याविरोधात युएपीए अंतर्गत  गुन्हा दाखल करावा आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर न्यायालयाने स्वतः सुमोटो दाखल करुन घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. कालच्या सभेत राज ठाकरे कडून चुकीचा इतिहास सांगितला गेला. शिवाजी महाराजांची समाधी प्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधली होती. खरा इतिहास त्यांनी आता वाचला पाहिजे. हिंदू-मुस्लीम राजकारण बंद करा दंगलीसाठी बहुजन तरूणाचा वापर करू नका. राज ठाकरेंच्या मुलाला भोंगा खाली उतरावायला पुढे पाठवा असेही फारूक अहमद यांनी सुनावले. यावेळी  राज्य प्रवक्ते  व उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे, पश्चिम चे जिल्हाध्यक्ष योगेश बंन, पूर्व चे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे युवक आघाडी जिल्हाध्यक्ष  सतिश गायकवाड शहराध्यक्ष  जलीस अहमद, अफसर पठाण, महासचिव रुपचंद गाडेकर, भगवान खिल्लारे, राजू देहाडे, आदी उपस्थित होते.


       
Tags: Farooque AhmedRaj ThakreVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

सर्वंकष समाज परिवर्तनाचा ध्यास घेणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रा. शिवाजी वाठोरे

Next Post

बोगस ‘इम्पिरीकल डेटा’ मुळे सर्वोच्च न्यायालयाने नाकारले ओबीसी आरक्षण – राजेंद्र पातोडे.

Next Post
बोगस ‘इम्पिरीकल डेटा’ मुळे सर्वोच्च न्यायालयाने नाकारले ओबीसी आरक्षण  – राजेंद्र पातोडे.

बोगस 'इम्पिरीकल डेटा' मुळे सर्वोच्च न्यायालयाने नाकारले ओबीसी आरक्षण - राजेंद्र पातोडे.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क