मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ चा रणधुमाळी सुरू झाली असून, मुंबईच्या राजकारणात आपली ताकद दाखवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज झाली आहे. आज विक्रोळी येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भव्य ‘जाहीर सभा’ आयोजित करण्यात आली आहे. या जाहीर सभेत ॲड. प्रकाश आंबेडकर कार्यकर्त्यांना तसेच मुंबईतील नागरिकांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या या जाहीर सभेसाठी कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारला आहे. या सभेमुळे ईशान्य मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वर्षा नगर, पार्क साईट, विक्रोळी (पश्चिम) येथे आज सायंकाळी ६ वाजता धडाडीचा भव्य जाहीर सभा पार पडणार आहे.
लातूर मनपा निवडणूक: प्रभाग १३ ‘अ’ मध्ये वंचितची ताकद, सुजात आंबेडकरांची जाहीर सभा उत्साहात
मुंबईच्या सत्तेसाठी ‘वंचित’चा एल्गार
मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत वंचित बहुजन घटकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी कंबर कसली आहे. विक्रोळी येथील ही सभा निवडणूक प्रचाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या सभेत प्रकाश आंबेडकर महापालिका प्रशासनातील भ्रष्टाचार, नागरी सुविधा आणि वस्त्यांमधील प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
पार्क साईट आणि विक्रोळी परिसरात सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून, मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील आगामी निवडणुकांसाठी प्रकाश आंबेडकर काय दिशा देतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






