Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

भाजप नेत्याची असंवेदनशीलता; भाजप अध्यक्ष नड्डांच्या समोर कमांडो बेशुद्ध, नेत्याने फिरवली पाठ; वडोदरा घटनेने संताप

mosami kewat by mosami kewat
November 30, 2025
in Uncategorized, बातमी, राजकीय, सामाजिक
0
भाजप नेत्याची असंवेदनशीलता; भाजप अध्यक्ष नड्डांच्या समोर कमांडो बेशुद्ध, नेत्याने फिरवली पाठ; वडोदरा घटनेने संताप
       
वडोदरा: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘एकता मार्च’ कार्यक्रमादरम्यान भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत एक अत्यंत धक्कादायक आणि असंवेदनशील घटना घडली आहे. नड्डा यांचे भाषण सुरू असताना स्टेजसमोर उभा असलेला ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्थेतील एक कमांडो अचानक खाली कोसळला आणि बेशुद्ध पडला.

मात्र, या गंभीर घटनेनंतरही जे.पी नड्डा यांनी आपले भाषण थांबवले नाही, तसेच मंचावरील एकाही नेत्याने मदतीसाठी धाव घेतली नाही, यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नेमकी घटना काय घडली?

वडोदरा येथे आयोजित कार्यक्रमात जेपी नड्डा यांचे भाषण सुरू होते. उभा असलेला एक सुरक्षा कमांडो आजारी पडून जमिनीवर कोसळला. उपस्थित लोकांनी तातडीने मदतीची अपेक्षा केली, परंतु पुढे जे घडले ते पाहून उपस्थितांना धक्का बसला.

कमांडो बेशुद्ध पडल्यानंतरही जेपी नड्डा यांनी क्षणभरही न थांबता आपले भाषण चालूच ठेवले. तसेच मंचावर बसलेल्या भाजपच्या एकाही नेत्याने खाली पडलेल्या त्या जवानाच्या मदतीसाठी कोणतेही पाऊल उचलले नाही किंवा मदतीची साधी विचारणाही केली नाही.

शेवटी, एका पत्रकाराने आपला कॅमेरा खाली ठेवून तातडीने त्या बेशुद्ध जवानाकडे धाव घेतली आणि त्याला मदत करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, इतर काही सुरक्षा रक्षक तिथे आले आणि त्यांनी त्या जवानाला उचलून उपचारासाठी नेले.

भाजपवर टीकेची झोड

या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून भाजपवर निर्दयी असल्याचा आरोप केला जात आहे. ही माणुसकी फक्त प्रचारासाठी असते का?असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत. भाजपच्या नेत्यांच्या मनात मनुष्यत्व नाही का, भावना नाहीत का, असा संताप व्यक्त केला जात आहे.

Tags: bjpJp naddaSardar vallabhbhai patelVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

कोपर्डी ते मालेगाव व्हाया खैरलांजी! महिला अत्याचाराचा अमानवी कल्लोळ

Next Post

पुर्णा नगरपरिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे शक्तिप्रदर्शन ; शहरात भव्य रॅली

Next Post
पुर्णा नगरपरिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे शक्तिप्रदर्शन ; शहरात भव्य रॅली

पुर्णा नगरपरिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे शक्तिप्रदर्शन ; शहरात भव्य रॅली

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home