Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

mosami kewat by mosami kewat
September 28, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!
       
औरंगाबाद : फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारांच्या Gen Z पिढीशी थेट संवाद साधण्यासाठी ‘जय भीम Gen Z’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आले आहे. या टाउनहॉलमध्ये SC, ST, OBC विद्यार्थ्यांसोबत हक्क-अधिकार, शिक्षण, रोजगार, सामाजिक विषमता, आरक्षण तसेच विविध सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर सुजात आंबेडकर यांच्याशी थेट संवाद साधता येणार आहे.

आतापर्यंत ज्या ज्वलंत प्रश्नांवर बोलण्यास किंवा चर्चा करण्यास टाळाटाळ करण्यात आली, अशा प्रश्नांवरही या संवादात मोकळेपणाने चर्चा होणार आहे. Gen Z मधील युवकांना आपले प्रश्न थेट सुजात आंबेडकर यांच्यासमोर मांडता येणार असून, त्या प्रश्नांची उत्तरेही त्यांना थेट मिळणार आहेत.

औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमासाठी आतापर्यंत 2 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. संत एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरा औरंगाबाद येथे दिनांक 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता ‘जय भीम Gen Z’ टाउन हॉल आयोजित करण्यात आला आहे. वेळेत नोंदणी केलेल्या Gen Z आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आयोजक समितीने आवाहन केले आहे.

Gen Z च्या प्रश्नांवर थेट संवाद –

Gen Z ही पिढी पेपरफुटी, बेरोजगारी, शिक्षण, जातीय विषमता, आरक्षण, हक्क-अधिकार आणि सरकारची जबाबदारी अशा विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करत आहे. या प्रश्नांसोबतच Gen Z च्या आकांक्षा, सामाजिक आणि राजकीय जाणीवा तसेच आजच्या बदलत्या परिस्थितीवरही या टाउन हॉलमध्ये चर्चा करण्यात येणार आहे.

‘जय भीम Gen Z’ हा केवळ एक कार्यक्रम नसून, प्रश्न विचारणाऱ्या, आपले मत मांडणाऱ्या आणि सामाजिक संवाद साधणाऱ्या फुले-शाहू-आंबेडकरवादी Gen Z पिढीसाठी एक संवादाचे विचारपीठ म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Tags: aurangabadGen zjai bhim gen z town hallMaharashtraSujat AmbedkarVanchit Bahujan AghadiYouth leadership
Previous Post

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

Next Post

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

Next Post
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा
बातमी

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

by mosami kewat
September 28, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे आयोजित करण्यात आलेल्या इराण...

Read moreDetails
औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

September 28, 2026
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

September 28, 2026
सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

September 28, 2026
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन खर्चन (नाना) यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन खर्चन (नाना) यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home