अकोट : नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांना पाठिंबा दर्शविला.

अकोट येथील जाहीर सभेत अंजलीताई आंबेडकर यांनी शहराचा विकास जाणूनबुजून प्रस्थापित पक्षांनी मागे ठेवला असे त्यांनी टीका केले. मूलभूत सुविधांचा अभाव, रोजगाराच्या संधींची कमतरता या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. अकोटच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीच्या नगरपरिषद अध्यक्षपदाच्या उमेदवार स्वाती मंगेश चिखले यांना तसेच नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधती शिरसाठ आणि युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, अकोट तालुका अध्यक्ष चरण इंगळे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.





