मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीचा रणसंग्राम आता चांगलाच रंगात आलाय. वंचित बहुजन आघाडीने आपली पूर्ण ताकद मैदानात उतरवली असून, पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर उद्या, ८ जानेवारीला मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. प्रभाग क्र. १९६ ते १३३ पर्यंतच्या उमेदवारांसाठी ताईंच्या एकापाठोपाठ एक अशा पाच सभा होणार असून, कार्यकर्त्यांमध्ये आतापासूनच मोठा उत्साह बघायला मिळतोय.
प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या दौऱ्याची सुरुवात दुपारी ४ वाजता मायानगर आणि भिमनगर (वॉर्ड क्र. १९६ व १९७) येथून होईल. इथल्या स्थानिक समस्या आणि वस्तीतल्या प्रश्नांवर अंजलीताई काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.
त्यानंतर संध्याकाळी ६:४५ वाजता विक्रोळीतल्या कन्नमवार नगर २ मधील श्रावस्ती बुद्धविहाराजवळ त्यांची दुसरी सभा होईल.
भांडुपमध्ये सभेचा धडाका
दौऱ्याचा पुढचा टप्पा भांडुपमध्ये असणार आहे.
फुले नगर (वॉर्ड क्र. ११४): रात्री ७:४५ वाजता सभेचं आयोजन करण्यात आले आहे.
माता रमाबाई आंबेडकर नगर (वॉर्ड क्र. ११२, ११८, ११९): रात्री ८:१५ वाजता इथल्या मोठ्या जनसमुदायाला अंजलीताई संबोधित करतील. भांडुपमध्ये वंचितची मोठी ताकद असल्याने या सभेला विक्रमी गर्दी पाहायल मिळणार आहे.
दौऱ्याचा शेवट रात्री ९ ते १० या वेळेत घाटकोपरच्या नालंदा (वॉर्ड क्र. १३३) भागात होणार आहे. या शेवटच्या सभेत अंजलीताई मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारावर आणि वंचितच्या विकास आराखड्यावर तोफ डागण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीचे मुंबईतले कार्यकर्ते या दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत.






