Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ऐन दिवाळीत आनंद हरपला ; गोरगरीब कुटुंब ‘आनंदाचा शिधा’ पासून वंचित राहणार

Akash Shelar by Akash Shelar
October 26, 2026
in बातमी
0
ऐन दिवाळीत आनंद हरपला ; गोरगरीब कुटुंब ‘आनंदाचा शिधा’ पासून वंचित राहणार
       

मुंबई : दिवाळी सणानिमित्त शासनातर्फे रेशन दुकानावर ‘आनंदाचा शिधा’ म्हणून साखर, तेल, डाळ, रवा अशा वस्तूंचे किट अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना वाटप केले जात होते. मात्र यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि शेतमजूर पूर्णपणे होरपळला असताना शासनाचा हा आनंदाचा शिधा नेमका कुठे गायब झाला? असा सवाल गोरगरीब नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दुष्काळातही आनंदाचा शिधा गरिबांना मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत गोरगरीब कुटुंब आणि शेतकरी, शेतमजूर यांचा आनंद हरपला की काय? असा सवाल उपस्थित होतोय. आनंदाचा शिधा देण्यासाठी प्रत्येक वेळी ५५०-६०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असते. ज्यावेळी शिधा द्यायचा असतो, त्यावेळी सूचना आल्यावर अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून मंत्रिमंडळापुढे खर्चाचा प्रस्ताव सादर केला जातो आणि तो मंजूर झाल्यावर निविदा काढून शिधावाटप केले जाते.

मात्र यंदाच्या दिवाळीनिमित्त कोणत्याही सूचना अद्याप देण्यात आल्या नाहीत. आर्थिक चणचणीमुळे राज्य सरकारने शिधावाटप न करण्याचे ठरविले आहे. गेल्या दोन वर्षांपासून शासनाने दिवाळीपूर्वी १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याची योजना सुरू केली होती. त्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला १ किलो साखर,१ लिटर तेल, १ किलो चना डाळ, १ किलो रवा दिले जात होते. त्यामुळे दिवाळीच्या फराळाला हातभार लागत होता. यंदा मात्र ऑक्टोबर महिना संपत आला तरी रेशन दुकानदारांकडे आनंदाच्या शिध्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आनंदाचा शिधा योजना सरकारने जाहीर केली. आम्ही कोणतीही योजना बंद करणार नाही, असे सांगितले. त्यावेळी शिधा असलेल्या पाकिटांवर नेत्यांनी फोटो छापून घेतले. यंदा दुष्काळ असूनही शिधा देणार नसल्याने गोरगरीब जनतेची दिवाळी अंधारात जाणार आहे. त्यामुळे आता ही योजना बंद केल्याचे तरी जाहीर करावे, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. दरम्यान, दुष्काळामुळे शेतमजुरांना रोजगार नाही. अशा परिस्थितीत शासनाने दिवाळीचा शिधा दुप्पट देणे अपेक्षित असताना साधा शिधाही न दिल्याने गोरगरीब कुटुंब अधिक चिंतेत आहे.


       
Tags: Anandacha ShidhaDiwaliMaharashtra
Previous Post

नागपूर पदवीधर मतदारसंघ: स्ट्राँग रूमचे १५ CCTV कॅमेरे बंद; वंचितच्या उमेदवाराचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ऐन दिवाळीत आनंद हरपला ; गोरगरीब कुटुंब ‘आनंदाचा शिधा’ पासून वंचित राहणार
बातमी

ऐन दिवाळीत आनंद हरपला ; गोरगरीब कुटुंब ‘आनंदाचा शिधा’ पासून वंचित राहणार

by Akash Shelar
October 26, 2026
0

मुंबई : दिवाळी सणानिमित्त शासनातर्फे रेशन दुकानावर ‘आनंदाचा शिधा’ म्हणून साखर, तेल, डाळ, रवा अशा वस्तूंचे किट अंत्योदय आणि प्राधान्य...

Read moreDetails
नागपूर पदवीधर मतदारसंघ: स्ट्राँग रूमचे १५ CCTV कॅमेरे बंद; वंचितच्या उमेदवाराचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

नागपूर पदवीधर मतदारसंघ: स्ट्राँग रूमचे १५ CCTV कॅमेरे बंद; वंचितच्या उमेदवाराचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

October 26, 2026
कुंभमेळ्याचा निधी दुष्काळ निवारणासाठी वळवा – सुजात आंबेडकर

कुंभमेळ्याचा निधी दुष्काळ निवारणासाठी वळवा – सुजात आंबेडकर

October 26, 2026
या दुष्काळात स्त्रियांना मोठा फटका बसणार – प्रा. अंजलीताई आंबेडकर

या दुष्काळात स्त्रियांना मोठा फटका बसणार – प्रा. अंजलीताई आंबेडकर

October 26, 2026
बुलढाण्यातील धम्ममेळाव्यातून ॲड. प्रकाश आंबेडकर कडाडले !

बुलढाण्यातील धम्ममेळाव्यातून ॲड. प्रकाश आंबेडकर कडाडले !

October 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home