सोलापूर : भारिप बहुजन महासंघाचे माजी शहराध्यक्ष आणि सोलापूर जिल्ह्यातील खंबीर भीमसैनिक सोहम लोंढे यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सोलापूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

या दुःखद प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सोहम लोंढे निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ता हरपला
सोहम लोंढे यांनी भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून सोलापूर शहरात पक्षाची बांधणी करण्यात मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सुजात आंबेडकर यांनी आपल्या अकोला आणि सोलापूर दौऱ्यादरम्यान वेळ काढून लोंढे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






