Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मंत्री गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करा; वंचितचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

mosami kewat by mosami kewat
January 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मंत्री गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करा; वंचितचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
       
अकोला : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव वगळल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यातून गिरीश महाजन यांच्या विरोधात नागरिकांकडून आंदोलने करण्यात येत आहे. 

आज गिरीश महाजन यांच्याविरुद्ध अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन देण्यात आले.

नेमकी घटना काय?

२६ जानेवारीला नाशिक येथे आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळ्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख टाळला. यावेळी महिला वनअधिकारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी प्रश्न उपस्थित केला आणि घोषणा दिल्या.

या घटनेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद दैंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

यावेळी उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारून आपला निषेध नोंदवला. गिरीश महाजन यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि त्यांना तात्काळ बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला जिल्हाध्यक्षा आम्रपाली खंडारे, गजानन गवई, राजकुमार दामोदर, किशोर जामणिक, वंदना वासनिक, मंगला शिरसाट, अरूराधा ठाकरे, मनोहर पंजवानी, प्रदीप शिरसाट, नितेश कीर्तक, विकास सदांशिव यांच्यासह युवा आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: AkolaConstitutionDr Babasaheb AmbedkarmlanashikpoliceVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

नांदेड: माता रमाई आंबेडकर चौकात गिरीश महाजनांचा निषेध; वंचित बहुजन युवा आघाडीची आंदोलनातून आक्रमक भूमिका

Next Post

महामानवाचे नाव वगळले जाणे, हा लोकशाही आणि राज्यघटनेचा अवमान आहे; वंचित आघाडीकडून जाहीर निषेध

Next Post
महामानवाचे नाव वगळले जाणे, हा लोकशाही आणि राज्यघटनेचा अवमान आहे; वंचित आघाडीकडून जाहीर निषेध

महामानवाचे नाव वगळले जाणे, हा लोकशाही आणि राज्यघटनेचा अवमान आहे; वंचित आघाडीकडून जाहीर निषेध

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जिद्दीला सलाम! माळमाथ्याच्या मातीत उमललं प्रेरणादायी यश; शेतकरी कन्या यूपीएससीत उत्तीर्ण
बातमी

जिद्दीला सलाम! माळमाथ्याच्या मातीत उमललं प्रेरणादायी यश; शेतकरी कन्या यूपीएससीत उत्तीर्ण

by mosami kewat
March 9, 2026
0

मालेगाव: माळमाथ्याच्या अवर्षणग्रस्त भागातून उंच भरारी घेत प्रेरणा खवळे हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यश मिळवत आपल्या कुटुंबासह आपल्या...

Read moreDetails
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : आकड्यांमागील आर्थिक राजकारण

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : आकड्यांमागील आर्थिक राजकारण

March 9, 2026
आदिवासी भागातील संघर्षाला यशाची जोड; हेमकृष्ण पिसदे यांचा UPSC मध्ये झेंडा!

आदिवासी भागातील संघर्षाला यशाची जोड; हेमकृष्ण पिसदे यांचा UPSC मध्ये झेंडा!

March 9, 2026
आई-बहिणीवरून शिवी दिली तर ५०० रुपये दंड; कोळगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय!

आई-बहिणीवरून शिवी दिली तर ५०० रुपये दंड; कोळगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय!

March 9, 2026
इराण–इस्रायल संघर्षाची झळ भारतात; एलपीजी वापरावर प्राधान्य, काही गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद

इराण–इस्रायल संघर्षाची झळ भारतात; एलपीजी वापरावर प्राधान्य, काही गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद

March 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home