अकोला : अकोला महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी सभागृहात आंदोलन छेडल्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. या गोंधळानंतर महापौरांनी विरोधी पक्षातील १४ नगरसेवकांना पुढील तीन सभांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
सभेदरम्यान वंचित बहुजन आघाडीकडून स्वीकृत सदस्य म्हणून निवड झालेल्या सुनील इन्नानी हे विषय मांडण्यासाठी उभे राहिले होते. मात्र, भाजप प्रणीत शहर सुधार समितीच्या नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. (Akola Budget Session Erupts in Chaos)
Also Read : माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा गॅस एजन्सीतील रांगेत दुर्दैवी मृत्यू; घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न?
या घोषणाबाजीला प्रत्युत्तर देत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर विरोधकांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे काही काळ सभागृहाचे कामकाज ठप्प झाले. (Akola Budget Session Erupts in Chaos)
गोंधळ वाढत चालल्याने आणि महापौरांनी १४ नगरसेवकांना पुढील तीन सभांसाठी निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला. यात वंचित बहुजन आघाडीच्या 5 नगरसेवकांचा समावेश आहे. या घटनेमुळे अकोला महापालिकेच्या राजकारणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.



