डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता ही वृत्तपत्रे आणि नियतकालिके त्यांच्या संघर्षाच्या विविध टप्प्यांवर सुरू केली. ४ फेब्रुवारी १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘जनता ‘ चे रुपांतर ‘प्रबुद्ध भारत’ मधे केले. जातिअंताच्या मार्गावर जाताना, जातिव्यवस्था जपणारी आणि जोपासणारी वैदिक हिंदू धर्माची चौकट नाकारण्याचा आणि बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ह्या टप्प्यावर संघर्षाची व समाज परिवर्तनाची पुढील दिशा स्पष्ट करणारे नियतकालिक प्रबुद्ध भारत त्यांनी सुरू केले. प्रबुद्ध भारतच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध जागृत झालेल्या समाजाला संघटित करून पुढील राजकारणाला आणि समाजकारणाला दिशा देण्याचा त्यांचा संकल्प होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रबुद्ध भारत च्या प्रकाशनाची जबाबदारी भैयासाहेब आंबेडकर यांनी सर्व समस्यांना तोंड देत पार पाडली. त्यानंतर अॅड. प्रकाश आंबेडकर प्रबुद्ध भारताच्या प्रकाशनाची जबाबदारी पार पाडत आहेत. ह्या कालावधीत मा. ज.वि. पवार, मा. डॉ. अशोक गायकवाड, मा. अविनाश डोळस, मा.भीमराव आंबेडकर यांचे योगदान महत्वाचे होते.
गेल्या काही वर्षात भारतात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शोषित, वंचित बहुजन समूहाचे प्रश्न ऐरणीवर आणणा-या आणि फुले आंबेडकरी विचार दृष्टिकोनातून देश विदेशातील घडामोडींवर टिपणी करणाऱ्या नियतकालिकाची समाजाला व देशाला गरज आहे. आता सर्वच मोठी वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे ठरावीक भांडवलदारांच्या हातात आहेत. भांडवलदारांना शोषित, वंचित बहुजन समूहाचे आणि पुरोगामी चळवळींचे प्रश्न छापण्यात रस नाही आणि पेडन्यूज च्या जमान्यात बातम्या छापून आणणेही अशक्य होत आहे. त्यामुळेच प्रबुद्ध भारत सारखे हक्काचे माध्यम आवश्यक आहे. तसेच ईंटरनेटच्या युगात ते माध्यम केवळ छापिल स्वरुपात न राहाता डीजीटल स्वरूपात असणे आवश्यक झाले आहे. त्यामुळेच प्रबुद्ध भारतचे ईंटरनेटच्या जगात ऑनलाईन न्युज पोर्टलच्याद्वारे माध्यमातून डिजीटल स्वरुपात आगमन झाले आहे. या नव्या माध्यमाद्वारे देश विदेशातील तरुण पिढी आता प्रबुद्ध भारतशी जोडली जाणार आहे आणि त्यावर व्यक्तसुद्धा होणार आहे. सध्या:च्या परिस्थित इतर सर्वच माध्यमे कार्पोरेट जगताच्या हातात असताना छापिल आणि डिजीटल स्वरूपातील प्रबुद्ध भारत बहुजनांचा आवाज आहे आणि राहील. संविधान मानणाऱ्या सर्व भारतीयांचे मुखपत्र म्हणून प्रबुद्ध भारत विधायक भूमिका पार पाडेल.
संपादक:
ॲड. प्रकाश आंबेडकर
संपादक मंडळ:
शांताराम पंदेरे | प्रा. प्रतिमा परदेशी | सुजात आंबेडकर
कार्यकारी संचालक
अंजली मायदेव
पाक्षिक वृतसंपादक
जीतरत्न पटाईत
वेब संपादक मंडळ:
ॲड. प्रियदर्शी तेलंग | सिद्धार्थ मोकळे
साक्य नितीन | सुमित वासनिक
वीर भागवत | वैभव खेडकर | संदीप तायडे
कायदा सल्लागार
ॲड. गायत्री कांबळे
कार्यालय व्यवस्थापन
संजय धावारे