बीड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी परळी येथील मुस्लिम समाजाचे युवा नेते शेख शाकेर अहमद यांच्यासह अनेक समाजांतील तरुणांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. यामुळे परळी तालुक्यात पक्षाची ताकद वाढली आहे.
हा पक्ष प्रवेश सोहळा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या जिजामाता उद्यानातील कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी मिलिंद घाडगे यांनी सर्व नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला समता सैनिक दलाचे कॅप्टन डॉ. स्वप्नील महाळंगीकर, तालुका अध्यक्ष गौतम साळवे, तालुका युवक अध्यक्ष राजेश सरवदे, शहराध्यक्ष धम्मानंद क्षीरसागर आणि तालुका महासचिव ज्ञानेश्वर गिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी शेख शाकेर अहमद यांच्यासह अकबर शेख, शेख मुजमील, शेख सलीम, सय्यद तुराब, सय्यद इम्तीयाज, सय्यद लायक, सागर कांबळे, अजय जाधव, विशाल अली शेख, ओम कराड, आदित्य व्हावळे, अरुण कराळे, अजय साबणे, अविनाश कराळे, वैभव लिंबुटकर, दिपक व्हावळे, केदार भातांगळे, विजय बुद्रे, रोहित पवार, कृष्णा देशमुख, अजय ठाकूर, प्रसाद कराड, समर्थ मुंडे, वैजनाथ कराळे, बिलाल कच्छी, आणि विशाल ओगले यांच्यासह असंख्य तरुणांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
या पक्ष प्रवेशानंतर जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत परळी तालुक्यात पक्षाचे संघटन वाढवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला सुभाष रोडे, बाळासाहेब कीरवले, भास्कर नावंदे, रवी मुंडे, आदेश पैठणे आणि सोनु वाघमारे यांसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Dhamma Chakra Pravartan Din 2025 : मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा; ओबीसी समाजाने वेळीच सावध व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर
अकोल्यात धम्म मेळाव्याला उसळला जनसागर अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन...
Read moreDetails