बीड : गेवराई तालुक्यात उपसरपंच म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गोविंद जगन्नाथ बरगे (वय 38) असं त्यांचं नाव असून, सोलापूर जिल्ह्यातील बार्शीजवळच्या सासुरे गावात त्यांच्या गाडीतच त्यांचा मृतदेह आढळून आला.
बरगे यांच्या डोक्याला पिस्तूलची गोळी लागलेली होती आणि गाडीत पिस्तूलही आढळल्याने हा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या, याबाबत ठोस माहिती अद्याप उपलब्ध नाही. पोलिसांनी तपास सुरू केला असून, पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा आहे.
गोविंद बरगे हे सोमवारी काही कामानिमित्त बार्शी येथे गेले होते. त्यांच्या मृत्यूची बातमी मंगळवारी सकाळी समोर आली, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आणि गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.