विसापूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या हितासाठी मोफत ई-केवायसी शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे आयोजन विसापूर ग्रामपंचायत कार्यालय जवळ, वार्ड क्र. 1 येथे करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांना राज्य व केंद्र पुरस्कृत विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असणारी ई-केवायसी प्रक्रिया मोफत करून देण्यात आली. त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाल सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना इत्यादी योजनांचा समावेश आहे.
या शिबिरात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला व आपल्या कागदपत्रांची ई-केवायसी करून घेतली. शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहून दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त केले.
या उपक्रमाचे आयोजक आशिष तितरे, वंचित बहुजन युवा आघाडी चंद्रपूरचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत पुणेकर, वंचित बहुजन आघाडी विसापूर शाखाध्यक्ष अविनाश वाघमारे, महिला आघाडी अध्यक्षा रीना कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
निलजय गावंडे, समीर शेख, अनंतसुग्रीव वानखेडे, गुलाब पुणेकर, मधुकर भोयर, स्वप्निल गिरडकर, अविनाश टोंगे, आकाश परचाके, नीरज झोडे, प्रकाश काळे आदी कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वीरित्या पार पाडले.
वंचित बहुजन आघाडी तर्फे दिव्यांग समाजाच्या हितासाठी सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन केले जात असून, आगामी काळात आणखी गावातील नागरिकांसाठी वंचित बहुजन आघाडीद्वारे व्यापक प्रमाणावर अशी शिबिरे घेण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.