मावळ : पुणे शहरात तीन महिलांवर झालेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या मावळ तालुक्याच्या वतीने वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सर्व पोलीस बांधवांना आणि भगिनींना राख्या बांधून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर आणि राज्य प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या आदेशानुसार, तसेच पुणे जिल्हाध्यक्ष सीमा भालेसैन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम १२ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडला. मावळ तालुका अध्यक्ष मनीषा ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी, सध्याच्या परिस्थितीत पोलीस प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून, पुणे शहरात घडलेल्या घटना दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त केले. समाजात महिला सुरक्षित राहाव्यात यासाठी पोलिसांनी आपल्या कर्तव्याचे आणि जबाबदारीचे भान ठेवावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमाला मनीषा ओव्हाळ (अध्यक्ष, मावळ तालुका), हर्षदा गजरमल (महासचिव, मावळ तालुका), शारदा ठुले (सचिव, मावळ तालुका), ज्योती गायकवाड (पदाधिकारी), कविता वासनिक (मावळ तालुका संघटक), बोधिमाला उके (वडगाव शहर संघटक), वैशाली गायकवाड (मोहितेवाडी महासचिव), अरुणा गायकवाड (मावळ तालुका सदस्य), सुमनताई गुणवडीकर (ज्येष्ठ कार्यकर्त्या) आणि स्नेहल चौरे (कार्यकर्ता) आदी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होते.