अकोला : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात असलेल्या शिरला आणि विवरा जिल्हा परिषद (ZP) सर्कलमधील वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जिंकण्याचा निर्धार करण्यात आला.
दिग्रस बुद्रुक आणि विवरा येथे झालेल्या या बैठकांमध्ये जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष आम्रपालीताई खंडारे आणि महासचिव संगीताताई अढाव यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत शिरला आणि विवरा सर्कलमधील कार्यकर्त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांचा बालेकिल्ला असलेले हे दोन्ही जिल्हा परिषद सर्कल पुन्हा एकदा जिंकून कायम ठेवण्याचा संकल्प केला.
या वेळी तालुकाध्यक्ष डॉ. धर्माळ, गजानन गवई, महिला तालुकाध्यक्ष अर्चना डाबेराव, युवक तालुका अध्यक्ष सम्राट तायडे, किरण सरदार, शरद सुरवाडे, अर्जुन टप्पे, मंगेश गोळे, मनोज गवई, राजू बोरकर, राजेश महल्ले, अरविंद महल्ले, ॲड. विक्रम जाधव, हिरासिंग राठोड, हरिभाऊ इंगोले, दुर्गाताई अवचार, मंगला इंगळे, मोबीन खान यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी; मालेगावात अंजलीताई आंबेडकर यांचा संवाद दौरा संपन्न
वाशिम : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय...
Read moreDetails