अकोला : अकोला शहरात कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात कार्यकर्त्यांकडून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानण्यात आले आहे. सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्याबद्दल हे बॅनर लावण्यात आले आहेत.
बॅनरवर, ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या युक्तिवादामुळे सुप्रीम कोर्टात सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे, असे नमूद करत त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच, हा लढा अजून संपलेला नाही, जोपर्यंत आरोपींना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील! असा संदेशही या बॅनरवर लिहिलेला आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रस्त्यापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या संघर्षाबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे. या बॅनरबाजीमुळे सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा शहरात सुरू झाली आहे.
’रक्षकच भक्षक बनू नये’, पोलिसांना राखी बांधून वंचित बहुजन महिला आघाडीने केली जबाबदारीची जाणीव
अकोला - वंचित बहुजन महिला आघाडीच्या अकोला जिल्हा शाखेने नुकताच रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. अकोला जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक...
Read moreDetails