बुलढाणा : वंचित बहुजन युवा आघाडीने युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी जनजागृती मोहीम राबवली. बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम खामगाव आणि शेगाव तालुक्यातील १३० गावांमध्ये पोहोचली. या मोहिमेला बौद्ध बांधवांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
या जनजागृती अभियानाचा समारोप खामगाव येथील बुद्ध विहार, गारडगाव येथे झाला. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक भीमराव तायडे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे राज्य सचिव रवींद्र इंगळे, जिल्हाध्यक्ष के. के. शेगोकार, महिला जिल्हाध्यक्षा विशाखाताई सावंग, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या जनजागृती अभियानात खामगाव आणि शेगाव तालुक्यातील अनेक बौद्ध विहारांना भेट देऊन बौद्ध बांधवांना महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
यावेळी अनिल वाकोडे (जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी), गौतम इंगळे (जिल्हा उपाध्यक्ष), गिरीश उमाळे (जिल्हा उपाध्यक्ष), उमेश इंगळे (शेगाव तालुका अध्यक्ष), दीपक विरघट (शेगाव तालुका महासचिव), अनिल सावदेकर (तालुका संरक्षण सचिव, भारतीय बौद्ध महासभा), रमेश गवार (तालुका संघटक, भारतीय बौद्ध महासभा), भिकाजी ईखारे (माजी तालुका उपाध्यक्ष, भारिप बहुजन महासंघ) आणि पवन तेलंग (जिल्हा सदस्य, वंचित बहुजन युवा आघाडी) यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो – प्रकाश आंबेडकर
अॅड. प्रकाश आंबेडकरांचे विरोधी पक्षांना आवाहन: ' ७६ लाख मतदानाच्या वाढीविरोधातील याचिकेत सहभागी व्हा'मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड....
Read moreDetails