रायगड : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रीय खजिनदार महेश भारतीय यांनी उरण पंचायती समितीला पत्र देऊन ग्रामपंचायतींमधील गैरकारभाराविरोधात आवाज उठवला आहे. चाणजे ग्रामपंचायतीच्या स्मिता विजय नाखवा आणि सोनारी ग्रामपंचायतीच्या सुनिता संजय कडू यांना न्याय मिळत नसल्याने वंचित बहुजन आघाडीने गटविकास अधिकारी यांना तक्रार केली.
या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने गटविकास अधिकारी यांच्याकडे पंचायत समिती विस्तार अधिकारी विनोद मुंडे यांच्यामार्फत एक शिफारस पत्र दिले. त्यावर तात्काळ कार्यवाही करत, मंगळवारी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत स्मिता नाखवा आणि सुनिता कडू यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे उरण तालुका संपर्क प्रमुख नेते, तालुका संघटक, राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्राप्त सत्यशोधक नरेश कोळी, अध्यक्ष तुकाराम खंडागळे, उपाध्यक्ष तुषार गायकवाड, तसेच अशोक वाघमारे, गणेश पाटील, सचिन भोईर, रोशन घरत, आणि सोमनाथ म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. या प्रकरणी प्रशासनाने त्वरित दखल घेऊन पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.