अकोला तालुक्यातील पळसो बढे गावात समता सैनिक दलात कार्यरत असलेल्या 21 वर्षीय रूपाली खांडेकर यांचे झोपेमध्ये सर्पदंशाने दुर्दैवी निधन झाले. या अचानक झालेल्या दु:खद घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
रूपाली खांडेकर यांच्या निधनानंतर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, तालुकाध्यक्ष किशोर जामनिक, गजानन गवई, शरद इंगोले यांनी पळसो बढे येथे जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. या भेटीत रूपाली यांच्या आई-वडील व बहिणींसह वंचित बहुजन आघाडीचे बाळूभाऊ उमाळे, रोशन धांदे, किशोर खांडेकर आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. रूपाली खांडेकर यांच्या सामाजिक कार्याची सर्वांनी आठवण घेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली