जळगाव : जळगाव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री बोढरे फाटा येथे मोठी कारवाई करत सुमारे 39 किलो ॲम्फेटामाईन हा अत्यंत घातक आणि प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त केला आहे. या ड्रग्सची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 40 ते 50 कोटी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, यामागे आंतरराज्यीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्क कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
गेल्या काही काळापासून जळगाव जिल्ह्यात ड्रग्स प्रकरणांनी जोर धरला आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी विधानसभा अधिवेशनातही हे प्रकरण गाजले होते. असे असतानाच ही मोठी कारवाई समोर आली आहे. जिल्ह्यात बाहेरून मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा पुरवठा होत असल्याने अनेक तरुण व्यसनाधीन होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी बोढरे फाट्याजवळ संशयित वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यांना 39 किलो वजनाचा ॲम्फेटामाईन हा अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी तात्काळ वाहनचालकाला अटक करून वाहन जप्त केले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हे ड्रग्स छत्रपती संभाजीनगरमार्गे कर्नाटकातील बंगळुरूकडे नेले जात असल्याची शक्यता आहे. ॲम्फेटामाईन हा पदार्थ प्रामुख्याने विदेशातून तस्करी करून भारतात आणला जातो आणि देशातील तरुण पिढीला व्यसनाधीन करण्यासाठी वापरला जातो, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ आंतरराज्यीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज नेटवर्कचा सहभाग असल्याची भीती व्यक्त होत आहे.
बौद्ध तरुणाच्या मारहाण प्रकरणी खामगावात तीव्र निषेध
खामगाव : गाय चोरीच्या आरोपावरून एका बौद्ध तरुणाला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ खामगावात बौद्ध समाजाने आज वंचित बहुजन...
Read moreDetails